लग्नाआधीच गरोदर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री? पोट लपवताना दिसली आणि गडबड झाली…

Uncategorized

बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळात झालेल्या सेलिब्रिटी विवाहसोहळ्यांनंतर यापैकी बऱ्याच जोड्यांनी त्यांच्या नात्यात नव्या पाहुण्याची चाहूल लागल्याची गोड बातमी दिली. मुद्दा असा, की या बातमीनंतर सेलिब्रिटी जोड्यांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला खरा. पण, सोबतच काही प्रश्नही उपस्थित झाले. लग्नाआधीच या जोडीच्या नात्यात बाळाच्या (pregnancy) आगमनाची माहिती मिळालेली का, हाच तो प्रश्न.

   

आता याच प्रश्नांच भडीमार केला जातोय अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) वर. काही दिवसांपूर्वीच रिचानं प्रियकर, अभिनेता अली फजल (Ali Fazal) शी लग्नगाठ बांधली. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विवाहसोहळ्यानंतर या जोडीनं जंगी पार्टीही दिली. (Richa Chadha Ali Fazal wedding) यामध्ये कुटुंबीय आणि बॉलिवूडमधील मित्रपरिवारानं हजेरी लावलीह होती. रिचा आणि अलिच्या लग्नाच्या चर्चा अजून जुन्याही झाल्या नाहीत तोच एका व्हिडीओनं सर्वांच्याच नजरा वळवल्या.

हे वाचा:   मालिका आहे की मिर्झापूर सीरिज... नवऱ्यानंतर अरुंधतीच्या मुलाचेही विवाहबाह्य संबंध, प्रेक्षक संतापले

Viral Video मध्ये रिचा वारंवार साडीच्या (saree look) पदरानं तिचं पोट झाकताना दिसत आहे. मध्येच ती अलिचा हातही सोडते, पण पदरानं पोट झाकणं काही बंद होत नाही. बस… मग काय? सोशल मीडियावर रिचाच्याच्या गरोदरपणाच्या चर्चांना वाव देण्यासाठी तिची ही एक कृतीही पुरेशी ठरतेय. (bollywood Actress Richa Chadha hides her tummy with saree netizens asummes her pregnancy)

रिचा पोट का लपवतेय? असंही नाही की तिनं बराच बोल्ड ड्रेस घातला आहे. चांगल्या साडीमध्ये तिच्यावर अशी काय वेळ यावी, की पदर वारंवार पोटावर घ्यायला लागतोय असाच प्रश्न चाहत्यांना पडला. मुद्दा असा, की रिचासुद्धा (Alia bhatt) आलियाप्रमाणेच लग्नाआधीच गरोदर होती का? अशीच शंका आता बळावू लागली आहे.

अद्यापही रिचा किंवा अलीकडून यासंदर्भातील कोणतीच माहिती, किंवा संकेत देण्यात आलेले नाहीत. पण, नेटकऱ्यांचा हा तर्क खरा ठरला तर पुन्हा एकदा लग्नाआधी गरोदर राहिलेल्या बी- टाऊनमधील अभिनेत्रींच्या नावांची चर्चा होणार हे खरं.

Leave a Reply