विचित्र कपडे आणि हटके फॅशनमुळे चर्चेत असलेली उर्फी आहे कोट्यवधींची मालकीण; संपत्तीचा आकडा वाचून तुम्हालाही येईल चक्कर

Uncategorized

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशनसाठी कायम चर्चेत असते.

   

तिचे कपडे आणि ड्रेसिंग स्टाईल विचित्र असलं तरी तिचे सोशल मीडियावर चांगलेच फॉलोअर्स आहेत.

कधी आपल्याच फोटोंपासून ड्रेस बनवून तो परिधान करणारी उर्फी फक्त कपडेच नव्हे तर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील प्रसिद्ध आहे.

तिला कपड्यांवरून अनेकदा ट्रोल केलं जातं.

पण ती ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत असते.

बरेच जण तिला ‘तुझ्याकडे कपडे घ्यायला पैसे नाहीत का,’ असंही सुनावत असतात. त्यामुळेच आज आपण उर्फीच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.

आपल्या हटके फॅशनसाठी ओळखली जाणारी उर्फी कोट्यवधींची मालकीण आहे. या विचित्र कपड्यांमुळे उर्फी लाखोंची कमाई करते आणि लक्झरी लाइफ जगते.

उर्फी जावेद एका एपिसोडसाठी २५- ३५ हजार रुपये मानधन घेते.ती महिन्याला जवळपास ३० लाख रुपये कमावते.

हे वाचा:   दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हॉस्पिटल मध्ये दाखल,आदिपुरुष चित्रपटाचे शूटिंग पण थांबवले

उर्फीची एकूण संपत्ती १७२ कोटींच्या घरात असल्याचं वृत्त अमर उजालाने रिपोर्ट्सच्या हवाल्याने दिलंय.

याशिवाय उर्फीजवळ स्वतःचं घर आणि लक्झरी कारही आहे.उर्फीजवळ Jeep Compass SUV कार असून तिची किंमत २५ लाख रुपये आहे.

उर्फीने आतापर्यंत ‘दुर्गा’, ‘सात फेरों की हेराफेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकांमध्ये काम केलंय.

Leave a Reply