‘सलमान खान ड्रग्ज घेतो, आमिरबद्दल माहिती नाही आणि अभिनेत्री तर…’; बाबा रामदेव यांची बॉलिवूडवर जहरी टीका!

Uncategorized

योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. नुकतेच बाबा रामदेव मुरादाबाद येथे पार पडलेल्या आर्यवीर महासंमेलनाच्या व्यासपीठावरून लोकांना अंमली पदार्थांपासून मुक्त होण्याचे आवाहन करताना दिसले.

   

दरम्यान, त्यांनी आपल्या भाषणात बॉलिवूड स्टार्सवरही जोरदार टीका केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर त्यांनी अंमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी अनेक बड्या कलाकारांचं नाव घेत टीकास्त्र सोडलं आहे.

‘सलमान (Salman Khan) ड्रग्ज घेतो, आमिरबद्दल (Aamir Khan) मला माहित नाही. तर, देवच बॉलिवूड अभिनेत्रींचा मालक आहे’, असं वक्तव्य त्यांनी या मंचावरून केलं. बाबा रामदेव म्हणाले की, शाहरुखचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला, त्यासाठी तो तुरुंगात गेला. सलमान खानही ड्रग्ज घेतो. आमिर खान ड्रग्ज घेतो की, नाही हे मला माहीत नाही. संपूर्ण बॉलिवूड ड्रग्जच्या विळख्यात आहे.

हे वाचा:   जान्हवी कपूर पुन्हा करतेय महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट? व्हिडीओ व्हायरल

आर्यवीर महासंमेलनात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील मुरादाबादला पोहोचले होते. त्यांच्या आधी याच ठिकाणी बाबा रामदेव यांची परिषद आणि एक व्याख्यानपार कार्यक्रम झाला होता. व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करतानाच, व्यसनमुक्तीसाठी स्वतःला वेळ द्या, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी बॉलिवूडचे नाव घेत, काही कलाकारांवर टीका केली. बाबा रामदेव यांनी शाहरुख खान आणि सलमानचे उदाहरण देत फिल्म इंडस्ट्रीवर ड्रग्ज सेवनाचा आरोप केला. सध्या बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात सतत नवनवीन माहिती समोर येत असते. अनेक कलाकारांची नावे ड्रग्ज प्रकरणात अडकली आहेत.

बाबा रामदेव यांनी पुढे सांगितले की ‘एक निश्चय आपणही केला पाहिजे की, संपूर्ण भारत भूमी ही ऋषीमुनींची भूमी आपण पूर्णपणे नशामुक्त केली पाहिजे. त्याची समाजाला गरज आहे. यामुळे लहान मुलं आणि विद्यार्थी यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे.’ त्यामुळे आजच विडी, सिगारेट, दारू सोडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हे वाचा:   छोटे कपडे घालणं Alia Bhatt ला पडलं महागात; झाली Oops Moment ची शिकार

बाबा रामदेव म्हणाले की, मी कुंभमध्ये चिलीम सोडण्याची मोहीम सुरू केली होती. साधूंना असे आवाहन केले की, तुम्हाला सर्व काही मिळेल. पण, ही चिलीम सोडा. बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, यानंतर शेकडो साधूंनी त्यांची चिलीम रामदेव बाबा यांच्याकडे सुपूर्द केल्या होत्या आणि म्हटले होते की, बाबाजी आजपासून आम्ही चिलीम ओढणार नाही.’

Leave a Reply