“हिला वेड लागलंय का?” अंगभर लायटिंग करून रस्त्यावर फिरतेय राखी सावंत, व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू होईल अनावर

Uncategorized

बॉलिवूडमधील ड्रामा क्वीन राखी सावंत कधी काय करेल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. वादग्रस्त विधानांमुळे राखी कायम चर्चेत असतेच. पण तिचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे विनोदी व्हिडीओही मजेशीर असतात. बॉयफ्रेंड आदिल खानबरोबरीने ती मजा-मस्ती करताना दिसते. राखीचा असाच एक मजेशी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी चक्क अंगाला लायटिंग करून फिरत आहे.

   

सध्या सगळीकडेच दिवाळी सेलिब्रेशनचं वातावरण तयार झालं आहे. पण राखीने काही वेगळ्या पद्धतीनेच दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली आहे. राखी चक्क अंगभर लायटिंग करून रस्त्यावर फिरत आहे.

पाहा व्हिडीओ

राखी दिवाळीच्या खरेदीसाठी एका दुकानामध्ये थांबली. तिथे डेकोरेशनसाठी सामान घेत असतानाचा हा तिचा व्हिडीओ आहे. दुकानामध्ये विक्रीसाठी असणारी लायटिंग ती अंगावर गुंडाळते आणि दुकानदाराला विचारते “सांगा मी कोणता फटाका आहे?” दुकानदारही म्हणतो, “तू आयटम बॉम्ब आहेस.” राखीचं हे वागणं पाहून रस्त्यावर उपस्थित असणारी मंडळीही हसू लागतात.

हे वाचा:   बॉलिवूडचा दमदार गायक-रॅपर बादशाहच्या आयुष्यात लेडी लव्हची एन्ट्री, पाहा कोण आहे ती अभिनेत्री?

“मी जिथपासून लंडनवरून आली आहे तिथपासून माझ्या अंगामध्ये लंडनची राणी अवतरली आहे. सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.” असंही राखी या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. राखीच्या या व्हिडीओला काही तासांमध्येच हजारो व्ह्युज मिळाले आहेत. तर काहींनी तुला वेड लागलंय का? असा प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारला आहे.

Leave a Reply