Madhuri Dixit Wedding Anniversary: लग्नाच्या २३व्या वाढदिवसादिवशी डॉ. नेने झाले रोमँटिक, माधुरी दीक्षितवर व्यक्त केलं प्रेम

Uncategorized

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित(Madhuri Dixit)नं आपल्या अभिनय आणि डान्स कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटवली आहे. माधुरी दीक्षितने १९९९ मध्ये डॉक्टर श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांच्याशी लग्न केले आणि आज म्हणजेच १७ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांच्या लग्नाला २३ वर्षे पूर्ण झाली. २३ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, डॉ नेने यांनी त्यांची पत्नी माधुरी दीक्षितसोबत एक फोटो शेअर करत रोमँटिक पोस्ट लिहिली आहे.

   

डॉक्टर नेने यांनी त्यांच्या २३व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माधुरी दीक्षितसोबतचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत माधुरी दीक्षित साध्या साडीत आणि गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर बिंदी अशा गेटअपमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे, तर डॉ नेनेदेखील क्रीम कुर्त्यामध्ये छान दिसत आहेत. पत्नीसोबतचा हा फोटो शेअर करत डॉ. श्रीराम नेने यांनी कॅप्शनमध्ये अभिनेत्रीबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केला. त्यांनी लिहिले, ‘प्रेम ही अशी गोष्ट आहे जी दोन जीवांना जोडते’.

माधुरीवरील प्रेम व्यक्त करताना त्याने पुढे लिहिले, ‘माझ्या प्रिय पत्नी उर्फ ​​माझे दिल, माझी आत्मा आणि माझ्या आयुष्याला २३ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’. डॉ नेने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘जशी आपण या अद्भुत प्रवासात प्रगती करत आहोत, तसतसे माझ्या हृदयातील तुझ्याबद्दलचे प्रेम अधिकच वाढत आहे. मी खूप आभारी आहे की तुम्ही आणि मी एकत्र आयुष्य बनवले आहे. आपल्याला अजून अनेक साहसी, आनंदाचे आणि प्रेमाचे क्षण अनेक वर्षे एकत्र घालवायचे आहेत. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.

माधुरी दीक्षितच्या २३ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनीही सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आणि दोघांनाही बेस्ट कपल म्हटले आहे.

हे वाचा:   Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेचा रुद्रावतार; निम्रतवर 'असा' काढला राग

Leave a Reply