Video : तैमूर खानचा तायक्वांदो खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले “ऑलिम्पिकमध्ये…”

Uncategorized

सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खान लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. अनेकदा तैमूर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होतो. तर कित्येकदा तो स्वत:ही फोटोसाठी पोझ देताना दिसला आहे. तैमूरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

   

आता तैमूरचा तायक्वांदो खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तैमूर या क्रीडा प्रकाराचा ड्रेस परिधान करुन प्रतिस्पर्ध्यासह तायक्वांदो खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन पोस्ट करण्यात आला आहे. तैमूरचा हा तायक्वांदो खेळतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.

तैमूरच्या व्हिडीओवर काहींनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी त्याला ट्रोलही केलंही आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत “तैमूरला दुखापत झाली तर त्याचं खेळणच बंद होईल”, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “प्रत्येक मुलाला याचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे”, असं म्हटलं आहे.

एक नेटकऱ्याने “आता तैमूरला राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी पाठवायचं का? की सरळ ऑलिम्पिकमध्ये पाठवायचं?”, अशी कमेंट केली आहे. “तैमूर एक लहान मुलगा आहे जो इतर मुलांप्रमाणेच त्याची कराटे मॅच खेळतो आहे. याकडे आपणही तसंच पाहिलं पाहिजे. प्रत्येक वेळी नकारात्मक कमेंट करणं गरजेचं नाही”, अशी कमेंटही एकाने केली आहे.

हे वाचा:   बॉलीवूड: चित्रात दिसणारी ही मुलगी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे, ती अभिनयाने लाखो मनांवर राज्य करते

रविवारी मुंबईत तायक्वांदो खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तैमूरसह बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्सने भाग घेतला होता. अभिनेता शाहरुख खानचा छोटा मुलगा अबराम यानेही खेळात सहभाग घेतला होता. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Leave a Reply