अभिनेत्री दिया मिर्झा ही कायमच तिच्या भूमिका सर्वांसमोर मांडत आली आहे. मुद्दा कोणताही आणि कितीही गंभीर असो त्यावर दियाने नेहमीच तिची ठाम भूमिका मांडली आहे. जगभरात आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या दिया मिर्झाचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेचा विषय ठरलं आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर साउथ इंडस्ट्री मध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
सध्या भारतातच नाही तर जगात एका व्हिडिओची चांगली चर्चा रंगली आहे. याच व्हिडिओवर अभिनेत्री दिया मिर्झाने देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. सगळीकडेच t20 वर्ल्ड कप ची धूम पाहायला मिळत आहे. या दरम्यान विराट कोहली सध्या चांगलाच फॉर्ममध्ये असल्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या रूमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
त्यानंतर, त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने यावरती चांगलाच संताप व्यक्त केला. कोणात्याही व्यक्तीच्या आयुष्यात प्रायव्हसी खूप महत्त्वाची असते. आणि अशाप्रकारे प्रायव्हसीचे उल्लंघन करणं पूर्णपणे चुकीचं आहे, असं म्हणत तिने हॉटेल मॅनेजमेंट वरती ताशेरे उडवले होते. हे प्रकरण चांगलंच तापलं आहे.
आता अभिनेत्री दिया मिर्झा ने देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. अभिनेत्री दिया मिर्झा ने आपले मत मांडत एका मुलाखतीत सांगितलं आहे की, ‘मागच्या दशकामध्ये अभिनेत्रीचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढून त्याचा गैरवापर झाल्याचं मी ऐकून होते. तेव्हापासून मी कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्याअगोदर मला दिलेली खोली नीट निरखून पाहते.
हॉटेलमध्ये आल्यानंतरच मी तेथील व्यपस्थापकांना खोली द्यायला लावते आणि स्वत:हून सर्वप्रथम त्या खोलीत कॅमेरे लपवले नसल्याची खात्री करुन घेते. मी खूप जास्त सावधगिरी बाळगते.’ दरम्यान, ‘प्रत्येकाने स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवं. जर हे तुमच्या बेडरुममध्ये घुसून केलं जात असेल तर मग मर्यादा कुठे आहेत? याचाही विचार व्हायला हवा,’ अस म्हणत अनुष्काने आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं आहे.