खरच अश्लील चित्रपट बनवले होते का? शिल्पा शेट्टीच्या पतीने पहिल्यांदाच दिलं उत्तर

Uncategorized

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासाठी 2021 हे वर्ष चांगलं राहिलं नाही. पोर्नोग्राफी प्रकरणात त्याचं नाव समोर आल्यानंतर जुलै 2021 मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली आणि 2 महिने तुरुंगात घालवल्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये तो जामिनावर बाहेर आला.

राज कुंद्रा सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. त्याला अनेकदा ट्रोलर्सना सामोरंही जावं लागतं. मात्र, काही काळापासून राज सोशल मीडियावर युजर्सच्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे देत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर, त्याने आता सांगितलं आहे की, तो खरोखर अश्लील चित्रपटांच्या निर्मितीमध्ये सामील होता की नाही?

राज कुंद्राला अटक कशी झाली?
ट्विटरवरील #Askraj सत्रात एका युजर्सने राज कुंद्राला विचारलं, “भाऊ तुम्हाला अटक कशी झाली? म्हणजे तुला कसं अडकवलं, काही खंडणी मागितली गेली किंवा शाहरुख खानचा मुलगा आर्यनला त्यांनी काय केलं. तुम्ही जर प्रामाणिक असाल तर सांगा की यात कोणाचा सहभाग होता आणि शेवटी तुम्ही अडकलात.”

हे वाचा:   52 वर्षीय महिला पडली 21 वर्षीय तरूणाच्या प्रेमात, लग्न करून म्हणाले - प्रेमात वयाचं बंधन नसतं

राज कुंद्राने दिलं हे उत्तर
युजरर्सच्या या प्रश्नाला राज कुंद्रानेही उत्तर दिले आहे. त्याने लिहिले की, “हे लवकरच बाहेर येईल! भ्रष्टाचार, सूड, निषेध आणि बरंच काही. मी माझ्या शुभचिंतकांना एक गोष्ट खात्रीपूर्वक देतो की, मी माझ्या आयुष्यात कधीही पोर्नोग्राफी आणि तिच्या निर्मितीमध्ये गुंतलेलो नाही.”

यादरम्यान राज कुंद्राने पत्नी शिल्पा शेट्टीशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आणि सांगितलं की मी तिच्यावर खूप प्रेम करतो, ती त्याची परी आहे आणि त्याला शिल्पाच्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम आहे.

Leave a Reply