आलियाला मिळाला डिस्चार्ज; पती रणबीर अन् लेकीसह रुग्णालयातून घरी जातानाचा व्हिडीओ व्हायरल

Uncategorized

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच आई-बाबा झाले आहेत. आलियाने रविवारी (६ नोव्हेंबर) गोंडस मुलीला जन्म दिला. बॉलिवूड ते अगदी हॉलिवूडच्या कलाकारांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीरची आई नीतू कपूर यांनादेखील आनंद झाला आहे, भट्ट व कपूर कुटुंबातील मंडळींनी सोशल मीडियाद्वारे खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला होता.

   

गुरुवारी सकाळी आलियाला रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला असून तिचा पती रणबीर कपूर हा तिला नेण्यासाठी आला होता. रुग्णालयामधून बाहेर पडतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.ज्यात रणबीर कपूर गाडीतून आपल्या घरी रवाना झाला. ६ नोव्हेंबरला आलिया आणि रणबीर मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालय रिलायन्समध्ये पोहोचले होते. त्यानंतर आलिया लवकरच बाळाला जन्म देईल अशी चर्चा रंगली होती. मात्र काही तासांच्या आतच आलियाने मुलीला जन्म दिला.

लेकीच्या जन्मानंतर आलिया भट आणि रणबीर कपूरसह कपूर कुटुंबीय त्यांच्या मुंबईतील ‘कृष्णराज’ या बंगल्यात गृहप्रवेश करणार आहेत. कपूर कुटुंबियांचा हा आलिशान बंगला आता आलिया-रणबीरच्या मुलीसाठी सज्ज झाला आहे. या बंगल्यात नुकतंच नुतनीकरण आणि इंटेरिअरचं काम करण्यात आलं आहे. कपूर कुटुंबियांच्या या आठ मजली बंगल्यात आलिया-रणबीरच्या मुलीसाठी खास एक मजला तयार करण्यात आला आहे.

हे वाचा:   एअर होस्टेस विमानात कधीच चहा-कॉफी का घेत नाहीत, कारण ऐकून तुम्हालाही येईल उलटी

Leave a Reply