Dimple Kapadia सोबत इंटिमेट सीन देताना या अभिनेत्याचा सुटला ताबा; पुढे जे झालं…

Uncategorized

विनोद खन्ना हे त्यांच्या काळातील सर्वाधिक डिमांड असणाऱ्या कलाकारांपैकी एक होते. एववेळ अशी होती जेव्हा प्रत्येक निर्माता-दिग्दर्शक त्यांना आपल्या सिनेमात घेवू ईच्छित होते. मात्र त्यांनी आपलं करिअरच्या उंचीवर पोहचून फिल्म इंडस्ट्रीचा किनारा केला होता. आणि ते आध्यात्मकडे वळले. मात्र, काही वर्षांनी इंडस्ट्रीत परतल्यावर त्यांना ते यश मिळालं नाही. त्याचवेळी विनोद खन्ना यांनी ‘प्रेम धर्म’ चित्रपटात डिंपल कपाडियासोबत काम केलं होतं. यादरम्यान डिंपलसोबत एक धक्कादायक घटना घडली.

   

महेश भट्ट दिग्दर्शक होते
डिंपल आणि विनोद महेश भट्ट यांच्या ‘प्रेम धर्म’ चित्रपटात काम करत होते. या चित्रपटाचं नाव नंतर बदलून ‘मार्ग’ असं ठेवण्यात आलं. जो 1992 मध्ये होम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. त्याचवेळी, चित्रपटसृष्टीबद्दल अफवा पसरवणाऱ्यांची कमी कधीच नव्हती. यापैकी एक अफवा विनोद खन्ना यांच्याबद्दलही पसरली होती. खरंतर, विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया एका इंटीमेट सीनचं शूटिंग करत होते. त्यावेळी विनोद यांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. असं घडलं की, विनोद यांनी डिंपलला किस केलं आणि मिठी मारावी लागली. 

हे वाचा:   वयाच्या 14 व्या वर्षी पदार्पण, 17 व्या वर्षी लग्न करून इंडस्ट्री सोडली, 90 च्या दशकातील ही बिकिनी गर्ल 30 वर्षांनंतर कमबॅक करण्यास सज्ज!

डिंपल कपाडिया घाबरल्या होत्या
सीन सेट होताच महेश भट्ट यांनी डिंपल आणि विनोद यांचं शूटिंग सुरू केलं. दिग्दर्शकांनी अॅक्शन बोलताच विनोद खन्ना यांनी डिंपलला किस करून मिठी मारायला सुरुवात केली. पण महेश भट्ट यांनी कट म्हटल्यानंतरही विनोद स्वत:ला रोखू शकले नाही. यामुळे डिंपल कपाडिया आणि महेश भट्ट यांना धक्का बसला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिंपलने मदतीसाठी हाक मारली, त्यानंतर चित्रपटाच्या टीमचे काही लोक विनोद आणि डिंपलपर्यंत पोहोचले आणि कट-कट ओरडले. (This actor lost his temper while giving an intimate scene with Dimple Kapadia the actress kept crying but…)

डिंपल इतकी घाबरली की, त्या मेकअप रूममध्ये बराच वेळ रडत राहिल्या. यानंतर महेश यांनी विनोद यांना डिंपलची माफी मागायला सांगितलं. इंटिमेट सीन्स देताना आपला ताबा सुटला असल्याची कबुली विनोद यांनी त्यावेळी दिली होती. त्यांनी सांगितलं की, ते खूप दिवसांनी एक इंटिमेट सीन शूट करत आहेत. त्यामुळे त्यांना यावर नियंत्रण ठेवता आलं नाही. विनोद खन्ना यांचं 2017 मध्ये कर्करोगामुळे निधन झालं.

Leave a Reply