गरोदर असल्याच्या चर्चांवर मलायका अरोराने सोडलं मौन, म्हणाली…

Uncategorized

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ४९व्या वर्षी मलायका अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याची बातमी ‘पिंकविला’ने दिली होती. त्यानंतर मलायका अरोरा व अर्जुन कपूर गूड न्यूज देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता खुद्द मलायका अरोरानेच गरोदर असल्याच्या चर्चांवर मौन सोडत संताप व्यक्त केला आहे.

   

मलायकाने ‘पिंकविला’ व त्यांच्या पत्रकारांना फटकारलं आहे. ‘पिंकविला’ने मलायका गरोदर असल्याची बातमी दिल्यानंतर अर्जुन कपूरने बातमीचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत संताप व्यक्त केला होता. “अत्यंत खालच्या थराला जाऊन आणि तेही अगदी सहजरित्या तुम्ही ही बातमी दिली. यातून असंवेदनशील व अनैतिकपणा दिसतो.

रोज अशा बातम्या तुम्ही देत आहात, ज्याकडे आम्ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. हे बरोबर नाही. आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका”, असं त्याने लिहीलं होतं.

हे वाचा:   Tarak Mehta: 'तारक मेहता' फेम दिशा वकानीला गळ्याचा कॅन्सर, दयाबेनच्या आवाजानं केला घात

मलायकाने अर्जुन कपूरची ही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत खोटी बातमी देणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. “हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे” असं तिने म्हटलं आहे. मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असून ही गूड न्यूज त्यांनी नातेवाईकांना दिली असल्याची बातमी पिंकविलाने दिली होती.

मलायका अरोरा व अर्जुन कपूर गेले अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत. मध्यंतरी ते दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं.

Leave a Reply