तनुश्री दत्ता हिच्या निशाण्यावर पुन्हा एकदा नाना पाटेकर, पोस्ट शेअर करत म्हटले की…

Uncategorized

नाना पाटेकर चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून नाना मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. 2020 मध्ये नाना पाटेकर शेवटी इट्स माय लाइफ या चित्रपटामध्ये शेवटचे दिसले होते. आता धुमधडाक्यात नाना पाटेकर पुनरागमन करणार असून प्रकाश झा यांच्या वेब सीरिजमध्ये नाना महत्वाच्या भूमिकेत आहेत. याचदरम्यान आता अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने तिचा मोर्चा नाना पाटेकरकडे परत एकदा वळवला आहे. तिने नानाला अनेक गोष्टी सुनावल्या आहेत.

   

नाना पाटेकर विरोधात तनुश्री दत्ता हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, चित्रपटसृष्टमध्ये असे काही पुरूष आहेत, जे तरुण आणि निष्पाप मुलींना त्रास देतात. इतकेच नाही तर त्यांचे करिअर खराब करून त्यांना आयुष्यामधून उठवण्याचा प्रयत्न करतात.

हे वाचा:   लग्न एकाशी अन् हनिमून दुसऱ्यासोबत; पळून गेलेल्या बायकोची नवऱ्याने झोपच उडवली, प्रियकराच्या पत्नीसोबत केलं असं काही…

अशा गोष्टी खूप जास्त वाईट आहेत. मला आणि माझ्यासारख्या कितीतरी मुलींना याने त्रास दिलाय. नाना पाटेकर हा एक दुष्ट माणूस आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्याचे चित्रपट तयार आहेत. परंतू रिलीज होत नाहीयेत यासाठी त्याला संघर्ष करावा लागतोय.

त्याचे चित्रपट फ्लाॅप आणि खराब जात आहेत. यामुळे आता तो ओटीटीवर काम करत आहे. तुम्ही गँग करून एखाद्या महिलेला गप्प करू शकता. पण सर्वांच्याच आत्माला सत्य नेमके काय आहे, हे माहिती आहे. डूबत्या माणसाला कोणीच वाचू शकत नाही. जो त्याची साथ देतो तो देखील डूबतो असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हे वाचा:   “दिग्दर्शकाने मला रूममध्ये बोलावलं अन्…” प्रसिद्ध अभिनेता राजीव खंडेलवालने केला होता धक्कादायक खुलासा

मीटूचा विषय ज्यावेळी चर्चेत आला होता. त्यावेळी तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकरवर मोठा आरोप करत म्हटले होते की, एका चित्रपटाच्या सेटवर माझ्यासोबत छेडछाड केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर तनुश्री सातत्याने नाना पाटेकर विरोधात पोस्ट शेअर करत असते.

Leave a Reply