‘मला भीती वाटत होती की कोणी…’ बहिणीवर अॅसिड हल्ल्यानंतर अशी झाली होती कंगनाची अवस्था

Uncategorized

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत स्पष्टवक्ती आहे. तिचे मत ती बिनधास्तपणे मांडते. कंगना तिच्या बेधडक स्वभावासाठी लोकप्रिय आहे. ती प्रत्येक बाबीवर तिचे मत स्पष्टपणे मांडते आणि त्याची चर्चा सुरु होते.  आता नुकतंच दिल्लीत एका 17 वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला झाला आहे. या  घटनेने कंगना राणौतला तिची बहीण रंगोलीसोबत घडलेल्या अशाच घटनेची आठवण झाली आहे. कंगना रनौतची बहीण रंगोली देखील ऍसिड हल्ल्याची शिकारी आहे. दिल्लीतील या हल्ल्यानंतर कंगना रणौतने इंस्टाग्रामवर बहिणीसोबत घडलेली घटना सांगत शोक व्यक्त केला आहे.

   

कंगनाने अॅसिड हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “मी किशोरवयीन असताना माझी बहीण रंगोलीवर रस्त्याच्या कडेला असलेल्या रोमियोने अॅसिड हल्ला केला होता. त्यानंतर तिच्यावर 52 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. तिच्यावर तेव्हा किती मानसिक आणि शारीरिक आघात झाला हे सांगणे कठीण आहे. एक कुटुंब म्हणून आम्ही तेव्हा उद्ध्वस्त झालो होतो.”

हे वाचा:   Plane Crash : विमान दुर्घटनेत प्रसिद्ध गायिकेचं निधन; सर्वत्र खळबळ

बहिणीवर झालेल्या या हल्ल्यामुळे कंगनाला सुद्धा जबर मानसिक त्रास सहन करावा लागला होता. पुढे तिने लिहिलंय कि, “त्यानंतर मला थेरपी घ्यावी लागली कारण मला भीती वाटत होती की जो कोणी माझ्या जवळून जाईल तो माझ्यावर ऍसिड टाकेल.  यामुळे जेव्हा जेव्हा माझ्याजवळून दुचाकीस्वार, कार किंवा अनोळखी व्यक्ती जात असे तेव्हा मी माझा चेहरा लपवत असे. हा अत्याचार अजूनही थांबलेला नाही. सरकारने याविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज आहे.  अॅसिड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.”

दरम्यान, कंगनाची बहीण रंगोलीबद्दल सांगायचं तर, तिच्यावर अॅसिड हल्ला झाला तेव्हा ती 21 वर्षांची होती. कंगनाने खुलासा केला होता की रंगोलीचा अर्धा चेहरा जळाला होता, तिच्या एका डोळ्याची दृष्टी देखील गेली होती, तसेच तिचा एक कान आणि एका स्तनालाही गंभीर इजा झाली होती. सध्या रांगोली विवाहित असून तिला पृथ्वीराज हा पाच वर्षांचा मुलगा आहे. ती अनेकदा चित्रपट इव्हेंट्स आणि स्क्रीनिंगमध्ये कंगनाला सपोर्ट करताना दिसते.

हे वाचा:   ‘मुख्य भूमिकेसाठी त्याने माझ्याकडून…’, नयरतारा हिच्याकडून कास्टिंग काउचबद्दल धक्कादायक खुलासा

कंगनाने सांगितलेल्या या आठवणी नंतर चाहते देखील तिला पाठींबा देत आहेत. येणाऱ्या काळात कंगना इतिहासातील एका महत्वाच्या प्रसंगावर आधारित चित्रपट घेऊन येत आहे. ‘इमर्जन्सी’ असं या चित्रपटाचं नाव असून कंगना या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे. तिच्या लूकची सगळेकडेच चर्चा होत आहे.

Leave a Reply