लघुशंकेच्या ब्रेकसाठी कारमधून उतरला आणि बायकोलाच विसरला; १५० किमी प्रवास केल्यानंतर कळलं अन्…

Uncategorized

प्रवासादरम्यान एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी ब्रेक घेतलेल्या जागी विसरण्याचा प्रकार तुमच्याबरोबरही घडला असेल. पण थायलंडमधील एका व्यक्तीने विसरण्याचा विक्रम वगैरे नावावर नोंदवावा असं प्रकार केला आहे. रोड ट्रीपदरम्यान लघुशंकेसाठी उतरल्यानंतर हा इसम चक्क आपल्या पत्नीलाच त्या ठिकाणी विसरुन पुढील प्रवासासाठी निघाला. बरं इतकंच नाही तर पत्नीला आपण विसरल्याची जाणीव त्याला १५० किमी प्रवास केल्यानंतर झाली. नाताळाच्या दिवशी हा प्रकार घडला आहे.

   

बॉनटॉम चायमून आणि त्याची पत्नी अ‍ॅमन्यूए चायमून हे दोघे त्यांच्या महा सर्खाम प्रांतातील मूळ गावी निघाले होते. नवीन वर्षाचं स्वागत आपल्या मूळ गावी करण्याचा या दोघांचा विचार होता. दोघांनीही प्रवास सुरु केला आणि तो अगदी मजेत सुरु होता जोपर्यंत या दोघांनी रात्री तीनच्या आसपास लघुशंकेसाठी ब्रेक घेण्याचं ठरवलं नाही. लघुशंकेसाठी ब्रेक घेतला असता ५५ वर्षीय बॉनटॉम हे गाडीमधून खाली उतरले आणि रस्त्याच्या पलीकडे लघवीसाठी गेले.

हे वाचा:   Ravi Jadhav: दिग्दर्शक रवी जाधव वयाच्या 51 व्या वर्षी पुन्हा अडकला लग्नबंधनात? पत्नीनं शेअर केला खास फोटो

त्यावेळी बॉनटॉम यांच्या पत्नीने इथं थांबण्याऐवजी तुम्ही पेट्रोल पंपावर का नाही गाडी थांबवली असा प्रश्न विचारला. त्यावर बॉनटॉम यांनी काहीही उत्तर दिलं नाही. पतीने उत्तर न दिल्याने बॉनटॉम यांची पत्नी रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडी झुडपांमध्ये लघवी करण्यासाठी निघून गेली. मात्र पत्नी गाडीतून उतरल्याचं बॉनटॉम यांच्या ध्यानात आलं नाही.

यानंतर जो प्रकार घडला तो आश्चर्यचकित करणार आहे. वयस्कर बॉनटॉम गाडीमध्ये बसले आणि निघून गेले. आपली पत्नी गाडीमध्ये नाही हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. दुसरीकडे अ‍ॅमन्यूए लघवी करुन आडोश्यातून बाहेर आल्यानंतर आपला पती आपल्याला सोडून निघून गेल्याचं समजल्याने थक्क झाल्या.

निर्मनुष्य ठिकाणी अंधारात एकट्या पडलेल्या अ‍ॅमन्यूए यांनी चालत राहण्याचा निश्चय केला. त्या जवळजवळ २० किलोमीटर चालल्या. त्या काबिन बुरी या जिल्ह्याच्या ठिकाणी पहाटे पाच वाजता पोहोचल्या. त्यांनी स्थानिक पोलीस स्थनकाशी संपर्क केला. त्यानंतर त्यांनी आपल्या गाडीमध्ये असलेल्या बॅगमध्ये ठेवलेल्या स्वत:च्या मोबाईलवर फोन केला. पतीचा फोन नंबर लक्षात नसल्याने त्यांनी स्वत:च्याच फोनवर कॉल केला. मात्र त्यांच्या पतीने फोन उचलला नाही.

हे वाचा:   अखेर अरूंधतीनं दिली प्रेमाची कबुली, 'आई कुठे काय करते' मालिका रोमॅन्टिक वळणावर

अखेर सकाळी आठ वाजता पोलिसांच्या मदतीने त्यांचा पतीशी संपर्क झाला. त्यावेळीही बॉनटॉ़म यांना आपण पत्नीला सोडून आल्याचं लक्षात नव्हतं. आपल्याबरोबर पत्नी प्रवास करत होती हे ते पूर्णपणे विसरले होते. मात्र तोपर्यंत ते पत्नीला ज्या ठिकाणी सोडलं तिथून तब्बल १५९.६ किलोमीटरवर पोहोचले होते.

Leave a Reply