Big B अमिताभ बच्चन यांची नात करतेय प्रसिद्ध अभिनेत्याला डेट; कारमध्ये दिसली अशा अवस्थेत

Uncategorized

बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेत असणारा विषय म्हणजे सेलिब्रिटींचे अफेअर्स. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या आयुष्यातील खास व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक चाहत्यांची असते. आता देखील एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सेलिब्रिटी स्वतःचं तोंड लपवताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

   

कॅमेऱ्यात कैद झालेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून महानायक अमिताभ बच्चन यांची नात आहे. बिग बींची नात नव्या नवेली नंदा आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी एकमेकांना डेट करत असल्याच्या रंगत आहेत.अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने तिच्या पॉडकास्टमुळे अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

नव्या (नव्या नवेली नंदा) यांनी तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन यांच्याशी अनेक मुद्द्यांवर संवाद साधला. मात्र, यावेळी नव्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

हे वाचा:   अंबानी कुटुंबाचा रॉयल थाट, दिवाळीआधी खरेदी केल्या दोन Rolls Royce, पाहा कशा आहेत लग्झरी कार्स

नव्या आणि सिद्धांत एकत्र दिसले
नव्या आणि सिद्धांतच्या नात्याच्या बातम्या अनेकदा लोकांचं लक्ष वेधून घेतात. नुकतेच दोघंही अमृतपाल सिंग बिंद्राच्या वाढदिवसाच्या पार्टीतून कारमधून बाहेर येताना दिसले. सगळ्यात आधी तुम्ही हा व्हायरल व्हिडिओ पाहा. 

खरं तर, फोन भूतच्या प्रमोशन दरम्यान, सिद्धांतने त्याच्या डेटिंगच्या प्रकरणाला साफपणे नकार दिला होता. आणि सांगितलं होतं की, ‘जर मी कोणाला डेट करत असेल….ही अफवा खरी झाल्यानंतर मला प्रचंड आनंद होईल.’. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे.  

रिपोर्ट्सनुसार, पापाराझी नव्याचा हा व्हिडिओ कॅमेरात कैद केला ज्यामध्ये, ती सीटच्या मागे लपलेली दिसली. नव्याने तिचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला आणि सिद्धांतच्या ड्रायव्हरने घाईघाईने त्याची गाडी पुढे घेतली. आम्ही तुम्हाला सांगतो की, बिग बिंची नात आणि सिद्धांत चतुर्वेदी किंवा आधिही अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगले आहे.

Leave a Reply