KBC: 7 कोटी देऊन याला इथून घालवा रे; चिमुकल्याचा कारनामा पाहून ‘बिग बीं’नी सोडली सीट!

Uncategorized

बॉलिवूडचे शेहनशहा अर्थात अमिताभ बच्चन (KBC Amitabh Bachchan) यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो अत्यंत लोकप्रिय आहे. केबीसीचा चौदावा सीझन सुरू असून यामध्ये कंटेस्टेंट आपल्या ज्ञानाच्या जोरावर लाखो रुपये जिंकतात. पण आता पुढच्या आठवड्यापासून या कार्यक्रमात काही खास पाहुणे येणार आहेत.

   

5 डिसेंबरपासून केबीसीच्या मंचावर अमिताभ बच्चन काही छोट्या पाहुण्यांचं स्वागत करणार आहेत. यासंबंधीचा एक प्रोमो सध्या तुफान व्हायरल होत असून सध्या त्याचीच तुफान चर्चा रंगली आहे. 

हॉट सीटवर अमिताभ यांच्यासमोर 11 वर्षांचा आदित्य श्रीवास्तव बसणार आहे. गुरुग्रामवरून आलेल्या आदित्यला आपल्याला असलेलं ज्ञान दुसऱ्याला देण्याची सवय आहे. आदित्यची बडबड ऐकून बिग बी कंटाळतात आणि शेवटी आपली सीट सोडून निघून जातात.

प्रोमोमध्ये आदित्य श्रीवास्तव हॉटसीटवर बसतो आणि सर मला असंच ज्ञान सांगायचं आहे असं म्हणतो. त्यावर बिग बी कम्पूटरला ज्ञाननाथजी तुम्हाला जबरदस्त टक्कर देणारा स्पर्धक येथे बसला आहे असं म्हणतात. आदित्य विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत जातो. 

अमिताब बच्चन शेवटी कंटाळतात आणि ज्ञाननाथजी साडे सात कोटी देऊन याला येथून घालवा असं म्हणतात. आदित्य श्रीवास्तव प्रश्नाचं उत्तर दिल्यावरही भरपूर बोलतो त्यामुळे अमिताभ बच्चन काही करूच शकत नाहीत, पुढे त्यांना अवघड होऊन जातं. त्यावर ते या मुलासोबत खेळणं खूप कठीण आहे असं म्हणतात आणि आपली सीट सोडतात.

हे वाचा:   पंतच्या मागे-मागे ‘उर्वशी’ पोहोचली ‘या’ शहरात, अखेरच्या क्षणी ऋषभकडून चकवा!

बिग बींना जाताना पाहून आदित्य पाठून त्यांना हाक मारतो आणि सर हे लॉक करून जायचं होतं असं म्हणतो. यावर सर्व प्रेक्षक जोरजोराने हसतात. प्रोमोवरून हा शो आता अधिक मजेशीर होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Leave a Reply