Pushpa 2 मध्ये होणार डबल धमाका! अल्लू अर्जुनसोबत झळकणार साऊथचा हा सुपरस्टार

Uncategorized

  साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा-द राईज’ या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत अनेक नवे रेकॉर्ड स्थापित केले आहेत. या चित्रपटाने लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच वेड लावलं आहे. या चित्रपटाचे डायलॉग्स आणि गाणी सतत लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळतात.

   

चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची जोडी सुपरहिट ठरली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागून आहे. अल्लू अर्जुन 12 डिसेंबरपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. पण याच दरम्यान चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.

मेकर्सनी आता ‘पुष्पा 2’ चित्रपटाची तयारी केली आहे. अल्लू अर्जुन 12 डिसेंबरपासून ‘पुष्पा 2’ ची शूटिंग सुरू करणार आहे. ‘पुष्पा’चे दिग्दर्शक सुकुमार हे  ‘पुष्पा 2’ हा चित्रपटाचा दुसरा भाग बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीयेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी या चित्रपटात मोठ्या कलाकारांची एंट्री होणार असल्याच्या बातम्या मीडियात येत आहेत.

हे वाचा:   आमदाराच्या मुलीचं अंतर्वस्त्र न घालताच हॉट फोटोशूट, फोटो समोर येताच...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुकुमार या चित्रपटात सुपरस्टार राम चरण कॅमिओ करणार आहे. या बातमीनंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मात्र, या वृत्ताची औपचारिक माहिती निर्माते किंवा चित्रपटाच्या टीमने दिलेली नाही.

‘पुष्पा 2’ या पॅन इंडिया चित्रपटात साऊथ सिनेसृष्टीतील दोन बडे स्टार्स एकत्र चित्रपटाच्या पडद्यावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. राम चरण या वर्षी रिलीज झालेल्या ‘RRR’ चित्रपटाने खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटापासून हे दोन्ही अभिनेते संपूर्ण भारतातील चाहत्यांचे फेव्हरेट स्टार बनले आहेत. आता या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

पुष्पा- द राईजच्या अफाट यशानंतर निर्मात्यांनी आता ‘पुष्पा- द रुल’ ची घोषणा केली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटोही मध्यंतरी शेअर करण्यात आले होते. आता यातील मुख्य अभिनेता अल्लू अर्जुनदेखील पुष्पा अवतारात शूटिंग सुरु करणार आहे.  चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचं समजताच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. पहिल्या भागाप्रमाणेच आता दुसऱ्या भागात काय रंजक असणार हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. चाहत्यांना लवकरच पुष्पा २ पाहायला मिळणार याची आता खात्री पटली आहे.

हे वाचा:   अखेर ठरलं! मलायका-अर्जुन लवकरच उरकणार साखरपुडा; याठिकाणी होणार शाही सोहळा

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ‘पुष्पा 2’ मध्ये सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात राम चरण काम करणार असेल तर त्याची कॅमिओ भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चित्रपट पुढील वर्षी 2024 मध्ये थिएटरमध्ये येऊ शकतो.

Leave a Reply