Video: विराट कोहलीची चाहत्यांना विनंती, ‘गाडीत वामिका आहे, कृपया..’

Uncategorized

Virushka baby Vamika : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिकाचा जन्म ११ जानेवारी २०२१ ला झाला. वामिकाच्या जन्मापासूनच विराट आणि अनुष्काने तिला मीडियापासून दूरच ठेवले. तसेच Media मीडियाला एक पत्र लिहित वामिकाचे फोटो कोणीही पब्लिश करु नका अशी विनंती केली. त्यामुळे वामिकाचा एकही स्पष्ट असा फोटो बघता आलेला नाही. नुकतेच Virushka विराट अनुष्का उत्तराखंड येथे सुट्टी चा आनंद घेण्यासाठी गेले असता तिथला एक अनुभव एका चाहत्याने शेअर केला आहे.

   

चाहत्याचा अनुभव नेमका काय होता ?

काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्का वामिकासोबत नैनीताल, उत्तराखंड येथे गेले होते. तिथे त्यांनी अनेक मंदिरांना भेट दिली. तिथे असलेले चाहते विराटसोबत एक फोटो मिळावा म्हणून गर्दी करत होते. kapilpeg या इन्स्टाग्राम हॅंडलवरुन चाहत्याने व्हिडिओ शेअर केला आहे. या चाहत्याला जसे कळले की विराट अनुष्का कैंची धाममध्ये आहेत. तर त्यांची झलक पाहण्यासाठी तो तिथे पोहोचला. 

हे वाचा:   अजिंक्य रहाणेचा संयम सुटला! बीसीसीआय संघात जागा देत नाही ​​म्हणून या देशाच्या संघाकडून खेळणार

विराटची चाहत्यांना विनंती 

कैंची धाम येथे पोहोचल्यावर त्याने मित्रांसोबत बराच वेळ वाट पाहिली. शेवटी त्यांना विराट कोहली आल्याचे समजले. चाहत्याने विराटसोबतचे ते क्षण कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले. विराटला बघण्यासाठी मोठी गर्दी जमलेली दिसत आहे. चाहत्याने आणि त्याच्या मित्रांनी विराटसोबत फोटो काढले. यावेळी विराटने चाहत्यांना विनंती केली गाडीत मुलगी वामिका आहे. तक कृपया फोटो काढु नका. चाहत्यांनी त्याच्या विनंतीचा आदर केला आणि वामिकाचा फोटो, व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही. 

Leave a Reply