अनुपमा-अनुजचा इंटिमेट सीन, दोघांना किस करताना पाहून प्रेक्षक म्हणाले, हा एपिसोड….

Uncategorized

छोट्या पडद्यावरील अनुपमा ही हिंदी मालिका या ना त्या कारणामुळं नेहमीच चर्चेत असते. या मालिकेतील कलाकार, कथानक असो किंवा मालिकेत येणारा नवीन एखादा ट्विस्ट याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते.

   

निर्मात्यांनी या मालिकेची कथा व कलाकार दोन्हीही उत्तम निवडले. यामुळं अजूनही कोणी या मालिकेला टीव्ही क्षेत्रात आव्हान देऊ शकलं नाही. मालिका सध्या एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. मालिकेतील एक रोमॅन्टिक सीन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

मालिकेत सध्या अनुपमा आणि अनुज यांची लव्हस्टोरी दाखवली जात आहे.

मालिकेत सध्या अनुज अनुपमावर नाराज असल्याचं दिसून येतंय. अनुजचा राग शांत करण्यासाठी अनुपमा प्रयत्न करतेय. पण काही केल्या त्याचा राग काही जात नाही. मग काय अनुमपा त्याच्यासाठी खास रोमॅन्टिक डेट प्लॅन करते. नुकताच त्यांच्या या डेटचा खास एपिसोड दाखवण्यात आला होता.

हे वाचा:   दोन्ही किडन्या निकामी, आर्थिक चणचण, औषधांचाही खर्च भागेना; प्रसिद्ध अभिनेत्रीला काम मिळणंही झालं बंद, म्हणाली, “डायलिसिसमुळे मला…”

हा एपिसोड प्रसारित होताच, या एपिसोडमधील किसींग सीनची जोरात चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर याच सीनची चर्चा सुरू आहे. या सीनचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.

अनुपमा म्हणजेच, रुपाली गांगुली आणि अनुज अर्थात गौरव खन्ना यांचा हा रोमॅन्टिक सीन चर्चेचा विषय ठरतोय. हा एपिसोड पाहिल्यानंतर मालिकेच्या चाहत्यांना आनंद झालाय. परंतु अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलही केलं आहे. चाहत्यांनी म्हटलंय की हा एपिसोड पाहण्यासाठी वाट पाहू शकत नाही तर, अनेकांनी आता टीआरपी आणखी वाढेल, अशाही कमेंट्स दिल्या आहेत.

दरम्यान, या मालिकेत अनुपमाची भूमिका अभिनेत्री रुपाली गांगुली साकारत आहे. तर वनराजच्या भूमिकेत सुधांशू पांडे आणि काव्याच्या भूमिकेत मदालसा शर्मा आहेत. मराठी मालिका आई कुठे काय करते या मालिकेचा हा हिंदी रिमेक आहे. तसंच या मालिकेची खास गोष्ट म्हणजे यात कोणताही अतिरिक्त ड्रामा दाखवण्यात आलेला नाही.

हे वाचा:   उर्फी जावेद पुन्हा एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात? आधी केले गंभीर आरोप अन् आता म्हणाली “आय लव्ह यू”

एका मध्यमवर्गीय कुटुंबात घडलेल्या आणि सद्य परिस्थितीत सुरू असलेल्या गोष्टींभोवतीच या मालिकेची कथा विणली गेली आहे. मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या रुपालीने अनुपमाची भूमिका अक्षरशः जिवंत केली. भूमिकेला योग्य न्याय दिल्यामुळेच ती आता टीव्ही जगतातील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री झाली आहे.

Leave a Reply