अभिनेता स्वप्नील जोशीने घेतली ‘चला हवा येऊ द्या’मधून अचानक एक्झिट; हे कारण आले समोर?

Uncategorized

मोठ्या पडद्यासह छोटा पडदाही गाजवणारा अभिनेता स्वप्नील जोशी सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. स्वप्नीलचा ‘वाळवी’ हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. स्वप्नील आपल्या आगामी चित्रपटाचं जोरात प्रमोशन करताना दिसत आहे.

या चित्रपटात त्याच्यासोबत सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. सगळीकडे या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मात्र दुसरीकडे एक वेगळीच बातमी समोर येत आहे.

स्वप्नीलने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ मधून एक्झिट घेतली आहे. तो कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत दिसतो. मात्र आता तो प्रेक्षकांना कार्यक्रमात दिसणार नाहीये. त्याने नुकताच कार्यक्रमाचा निरोप घेतला आहे.

हे वाचा:   'मला भीती वाटत होती की कोणी...' बहिणीवर अॅसिड हल्ल्यानंतर अशी झाली होती कंगनाची अवस्था

स्वप्नील सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. त्याने आजवर आपल्या चॉकलेट बॉयच्या रूपातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र आता तो ‘वाळवी’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना काहीतरी नवं देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच त्याच्या या चित्रपटासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. सोबतच तो झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतही मुख्य भूमिका साकारताना दिसतोय.

त्यातच तो इतर जाहिराती आणि एन्डॉर्समेंटदेखील करत असतो. सोबतच तो सोमवार आणि मंगळवार ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये परीक्षकाच्या खुर्चीतही दिसतो. मात्र आता त्याने या कार्यक्रमाचा निरोप घेतला आहे. त्याने हा निर्णय का घेतला यामागचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. मात्र प्रचंड काम आणि नव्या प्रोजेक्ट्समुळे स्वप्नीलने हा कार्यक्रम सोडला असल्याचं म्हटलं जातंय.

हे वाचा:   करीना, कतरिनानंतर आता `ही` मराठमोळी अभिनेत्री लपवत्येय Baby Bump? फोटो व्हायरल

स्वप्नीलने आपल्या सिनेसृष्टीतील अभिनयाची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. त्याने ‘कृष्णा’ची भूमिका साकारत प्रेक्षकांना वेड लावलं होतं. त्यानंतर त्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्येच आपलं करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. मात्र त्याच्या या निर्णयाने आता प्रेक्षक थोडेसे नाराज झाले आहेत. मात्र तो नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply