तिहार तुरुंगातून प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्नाची मागणी; धक्कादायक घटनेनंतर ‘ती’ वादाच्या भोवऱ्यात

Uncategorized

मुंबई : ‘बडे अच्छे लगते हैं’ (bade achhe lagte hain) फेम अभिनेत्री चाहत खन्ना (chahat khanna) सध्या एका धक्कादायक प्रसंगामुळे चर्चेत आली आहे. आरोपी सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आतापर्यंत जॅकलीन फर्नांडिस, नोरा फतेही यांच्यासोबत चाहत खन्ना हिचं नाव देखील समोर आलं आहे. अनेक अभिनेत्री सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrashekhar) याची तुरुंगात जावून भेट घेतली. यामध्ये चाहत हिचं देखील नाव आहे. नुकताच चाहत हिने दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात जबाब नोंदवला आहे. शिवाय एका मुलाखतीत अभिनेत्री सुकेश चंद्रशेखरबद्दल मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे चाहत तुफान चर्चेत आली आहे.

जेव्हा चाहत सुकेश याला भेटायला तुरुंगात गेली, त्यानंतर अभिनेत्री अनेकदा धमकावण्यात आलं. चाहत मुलाखतीत म्हणाली, मे २०१८ मध्ये चाहत हिला दिल्ली येथील शाळेत एका कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून बोलावण्याच आलं होतं. तेव्हा दिल्ली येथे पोहोचताच तिला एंजल खान नावाची एक महिला भेटली. जी चाहतला शाळेत घेवून जाणार होती. तेव्हा एंजलने चाहतला रस्त्यात उतरवलं आणि दुसऱ्या गाडीमध्ये बसण्यास सांगितलं.

हे वाचा:   अभिनेत्री अक्षरा सिंहचा MMS लीक, अभिनेत्री म्हणाली- तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाहीत का

दुसऱ्या गाडीमध्ये बसल्यानंतर चाहतची फसवणूक करून तिला तिहार जेलमध्ये नेण्यात आलं. जेव्हा चाहतने एंजलला विचारलं तेव्हा एंजल चाहतला म्हणाली तुरुंगाच्या परिसरातून शाळेत जाण्यासाठी रस्ता आहे. एंजल पिंकी ईराणी हिच्यासाठी काम करते. जेव्हा चाहतला कळालं की आपल्याला तुरुंगात आणलं आहे, तेव्हा अभिनेत्री घाबरली.

चाहत म्हणाली, ‘मला कळालं होतं मी पूर्णपणे अडकली आहे. मी माझ्या दोन मुलांसाठी घाबरली होती. कारमधून उतरवल्यानंतर मला एका खोलीत घेवून गेले. माझ्या लक्षात आहे, त्याठिकाणी लॅपटॉप, घड्याळ आणि महाड्या वस्तू होत्या. एवढंच नाही तर, अनेक वेग-वेगळ्या ब्रँड्सच्या बॅग देखील होत्या. त्या खोलीमध्ये एक सोफा होता. पोर्टेबल एसी, फ्रिज…त्या छोट्या खोलीत सर्वकाही होतं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

हे वाचा:   दिवाळीच्या या दिवशी पाकिटात गुपचूप ठेवा ही 1 वस्तू; पाकीट नेहमी भरलेलं राहील..लक्ष्मी सदैव सोबत राहील..जाणून घ्या

चाहत पुढे म्हणाली, ‘त्या खोलीमध्ये एक व्यक्ती होती. ज्याने स्वतःचं नाव शेखर रेड्डी असल्याचं सांगितलं. गुडघ्यांवर बसून त्याने मला लग्नासाठी मागणी घातली. तेव्हा मी त्याच्यावर ओरडली आणि म्हणाली, माझं लग्न झालं आहे आणि मला दोन मुलं आहेत.’ या कारणामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे.

Leave a Reply