मलायकाचे ग्लॅमरस कपडे ठरले घटस्फोटाचं कारण? अरबाज खानने स्वतः सांगितलं सत्य

Uncategorized

बॉलिवूडची स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री-डान्सर मलायका अरोरा तिच्या फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.मलायका आपल्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. मलायकाच्या लव्ह लाईफमध्येही लोक खूप रस घेतात.

   

2017 मध्ये पती अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. सुरुवातीला या दोघांनी आपलं नातं गुपित ठेवलं होतं. मात्र आता मलायका आणि अर्जुन आपल्या नात्याबद्दल उघडपणे बोलताना दिसून येतात. मलायका अरोराने 1998 मध्ये अरबाज खानशी लग्न केलं होतं.

या दोघांना अरहान नावाचा एक मुलगादेखील आहे.मलायका आणि अरबाज यांची केमिस्ट्री लोकांना फारच पसंत पडत होती. मात्र अचानकपणे या दोघांनी विभक्त होत सर्वांनाच धक्का दिला होता. तब्बल19 वर्षे एकत्र संसार केल्यानंतर दोघेही विभक्त झाले होते. याआधी मलायका अरोराने मुलाखतीत असं म्हटलं होतं की, तिला पुढील जन्मातही खान कुटुंबाची सून व्हायचं आहे. परंतु पुढे काही दिवसांतच मलायका आणि अरबाजमध्ये काहीतरी बिनसलं आणि अरबाज मलायकाचं नातं संपुष्टात आलं होतं.

हे वाचा:   HBD Big B;वर्षातून दोन वेळेस साजरा करतात अमिताभ बच्चन वाढदिवस , 40 वर्ष जुन्या भीषण अपघातानंतर सुरू झाली परंपरा

त्यांच्या घटस्फोटाची प्रचंड चर्चा झाली होती. सर्वकाही ठीक असताना अचानक दोघांमध्ये काय बिनसलं? असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित झाला होता.मलायका आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर लोक सोशल मीडियावर विविध प्रकारचे अंदाज बांधत होते. अनेकवेळा असं म्हटलं जायचं की, मलायकाचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज अरबाजला खटकायचा. आणि याच कारणामुळे त्यांचा घटस्फोट झाल्याचं म्हटलं जात होतं.

यावर अरबाज खानने काय उत्तर दिलं होतं ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.एका मुलाखतीमध्ये अरबाज खानला मलायकाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी त्याने मनमोकळे पणाने उत्तर दिलं होतं. या मुलाखतीत अभिनेत्याला विचारण्यात आलं होतं की, ‘त्याने कधीही मलायकाच्या ग्लॅमरस कपड्यांवर आक्षेप घेतला आहे का?

हे वाचा:   सत्या आणि श्रावणीचं पुढे काय झालं?..वेडच्या यशानंतर रितेशची एक घोषणा..

यावर उत्तर देत अरबाज म्हणाला, ‘नाही.. मी असं कधीच केलं नाही. मी मलायकाला तिच्या ड्रेस स्टाईलबाबत कधीच काहीही बंधन लावलं नाही. मी कधीही तिला तिच्याबाबत विचारलं नाही. कारण आपण एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करायला अडवतो तेव्हा ते तीच गोष्ट अजून जास्त करतात. असं माझं मत आहे. त्यामुळे मी कधीही आक्षेप घेतला नाही’.

Leave a Reply