रितेश देशमुख-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट पाहा फक्त ९९ रुपयांत, कधी आणि कुठे? जाणून घ्या

Uncategorized

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखचा ‘वेड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करत आहेत.

   

‘वेड’ चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तर जिनिलीयाने या चित्रपटाच्या निमित्ताने १० वर्षांनी कलाविश्वात पुनरागमन केलं आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच कोटींची कमाई करणारा हा चित्रपट अवघ्या तीन आठवड्यांतच ५० कोटींच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे.

‘वेड’ चित्रपटाला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून भारावलेल्या रितेश देशमुखने चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा केली आहे.

येत्या शुक्रवारी म्हणजेच २० जानेवारीला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

एडिट केलेले काही सीन्स व सत्या-श्रावणीचं रोमॅंटिक गाणं चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

‘वेड’ चित्रपटाच्या नवीन व्हर्जनबरोबरच आणखी एक खुशखबर प्रेक्षकांसाठी आहे.

हे वाचा:   कपाळावर टिळा लावल्यानंतर त्यावर तांदूळ का लावले जाते..जाणून घ्या यामागील कारण..

२० जानेवारीला ‘वेड’ चित्रपट फक्त ९९ रुपयांत पाहता येणार आहे. येत्या शुक्रवारी ‘सिनेमा लव्हर्स डे’ सेलिब्रेट करण्यात येणार आहे.यानिमित्ताने चित्रपटगृहांत मराठी, हिंदी अशा सगळ्या चित्रपटांची तिकिटं केवळ ९९ रुपयांना उपलब्ध असणार आहेत.

त्यामुळे महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या रितेश देशमुखच्या चित्रपटाबरोबर ‘वाळवी’ हा नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपटही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत फक्त ९९ रुपयांत पाहता येईल.

Leave a Reply