लग्नानंतर काय बदललं? राणादा म्हणतो, “मी विसरून जातो, घरी बायको…”

Uncategorized

मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधर २ डिसेंबरला अभिनेता हार्दिक जोशीसह विवाहबद्ध झाली. त्यांच्या शाही लग्नाची चर्चा झाली होती. अक्षया व हार्दिक दोघेही सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर हार्दिक-अक्षया त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदात घालवत आहेत.

   

लग्नानंतर ते नाशिकला देवदर्शनासाठी गेले होते. नुकतेच हे जोडपे साम स्टुडिओमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी लग्नाबद्दल, आपल्या खासगी आयुष्याबद्दलच्या गोष्टी शेअर केल्या तसेच हार्दिकने नव्या वर्षाच्या संकल्पाबद्दल सांगितले.

सध्या देशात सगळीकडे नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. नववर्षासाठी अनेक जण संकल्प करत आहेत. हार्दिकने मुलाखतीत असं सांगितलं की “लग्नाच्या दुसऱ्या दिवसांपासून कामं सुरु झाली आहेत. अजूनही मी विसरतो बायको घरात आलेली आहे. घरातून निघाल्यावर विसरून जातो घरात बायको आहे. येणाऱ्या नवीन वर्षात मी तिला वचन देतो की १ तारखेपासून मी संकल्प करतो मी तिला फोन करत जाईन.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

हे वाचा:   विवेक ओबेरॉय चा ऐश्वर्या रॉय बद्दल मोठा खुलासा,म्हणाला मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि आ,त्म-हत्या.....

अक्षया व हार्दिकने पुण्यात सप्तपदी घेत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. शाही विवाहसोहळ्यातील हळदी, संगीत व मेहंदी कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. राणादा-पाठकबाई या रील लाइफ जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधल्याने चाहते आनंदी आहेत.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली राणादा-पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. या जोडीला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. लवकरच हार्दिक ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply