दीपिका आणि रणवीर नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. 2018 मध्ये या कपलने लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाला ची वर्ष झाली आहेत. आता हे कपल गुडन्यूज कधी देणार याकडे त्यांच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र दिपिकाच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ पहायला मिळत आहे.
ही अभिनेत्री तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या प्रोफेशनललाईफमुळे चर्चेत असते. दीपिका पदुकोणने 2018 साली अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न केले होते. त्याच वेळी, अभिनेत्री तिच्या कुटुंब बाढवण्याबाबत बोलताना दिसत आहे. दीपिकाने तिचे कुटुंब नियोजन शेअर केलं आहे.
‘मला आशा आहे की जेव्हा मी आणि रणवीर फॅमिली प्लॅनिंग करु, तेव्हा आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार असू. लहानपणी मी माझ्या आई-वडिलांसोबत अनुभवलं आहे. एका मुलाखतीत कौटुंबिक नियोजनावर चर्चा करताना दीपिका पदुकोण ने हे वक्तव्य केलं. दीपिकाच्या या वक्तव्यामुळे अभिनेत्री लवकरच आनंदाची बातमी जाहीर करू शकते, असा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. मात्र, दीपिकाला कधी आई व्हायला आवडेल याबाबत तिने काहीही सांगितलेलं नाही.
Ranveer Singh चं बेबी प्लानिंगवर मोठं वक्तव्य
त्याचबरोबर रणवीर सिंगनेही आपल्या फॅमिली प्लॅनिंगबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्याला एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं की, जर तुम्ही आणि दीपिका एका मुलीचे पालक बनलात तर तुम्ही तिचं नाव काय ठेवणार? या प्रश्नाला उत्तर देत रणवीर बाळाला इंडस्ट्रीतील ‘बाजीराव’ म्हणाला होता, “माझी अनेक नावं आहेत आणि त्यासाठी मी दीपिकाशीही चर्चा करत असतो. रणवीरने नाव उघड केलं नसलं तरी, त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा झाली होती.
दीपिका पादुकोण बॉलिवूडची सगळ्यात हॉट आणि स्टाईलिश अभिनेत्रीपैकी एक आहे. अभिनेत्रीच्या सौंदर्य आणि जबरदस्त एक्टिंगचे लाखो चाहते आहेत. दीपिकाने फक्त बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपली खास ओळख निर्माण केली आहे. आपल्या करिअरमध्ये दीपिकाने अनेक हिट सिनेमा दिले आहेत. दीपिका केवळ आपल्या सिनेमाच नव्हेतर तर आपल्या खऱ्या आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते.