विराट कोहली-अनुष्का शर्मा बॉडीगार्डवर खर्च करतात कोट्यवधी रुपये,पगार जाणून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Uncategorized

बॉलिवूड स्टार्स आपल्या सुरक्षेसाठी खूप पैसा खर्च करतात. बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सजवळ स्वतःची सिक्युरिटी म्हणजे संरक्षण यंत्रणा असते, जेणेकरून ते सार्वजनिक ठिकाणी जातात तेव्हा त्यांना अज्ञात धोक्यापासून सुरक्षित राहता येतं. सामान्यपणे असं संरक्षण पुरवणाऱ्या खासगी एजन्सी असतात. बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा आणि स्टार क्रिकेटर विराट कोहली यांच्याकडेही पर्सनल सिक्युरिटी आहे. त्यांचा पर्सनल बॉडीगार्ड असून त्याचं नाव सोनू आहे. सोनू अनेक वर्षांपासून अनुष्का शर्माचं संरक्षण करत आहे. अनुष्का शर्मा बॉडीगार्ड प्रकाश सिंग उर्फ सोनूला त्याच्या कामाचा मोबदला म्हणून मोठी रक्कम देते.

   

अनुष्का शर्माने विराट कोहलीशी लग्न करण्याच्या आधीपासून सोनू अनुष्काचा बॉडीगार्ड आहे. Zoom.comच्या वृत्तानुसार, प्रकाश सिंह उर्फ सोनूचा वार्षिक पगार तब्बल 1.2 कोटी रुपये आहे. म्हणजेच सोनूचा पगार अनेक कंपन्यांच्या सीईओंच्या सीटीसीपेक्षाही जास्त आहे.

हे वाचा:   तिहार तुरुंगातून प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्नाची मागणी; धक्कादायक घटनेनंतर ‘ती’ वादाच्या भोवऱ्यात

अनुष्का आणि विराटसाठी सोनू फक्त बॉडीगार्ड नाही, तर कुटुंबातील सदस्य आहे. ते त्याला कुटुंबातील सदस्यासारखं वागवतात. अनुष्का दरवर्षी सोनूचा वाढदिवस साजरा करते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण शाहरुख खानसोबत ‘झिरो’ चित्रपटाचं शूटिंग करत असताना अनुष्काने चित्रपटाच्या सेटवर सोनूचा वाढदिवस साजरा केला होता.

सार्वजनिक ठिकाणीही सोनू विराट कोहलीला सिक्युरिटी पुरवतो. विराटची स्वतःची सिक्युरिटी आहे, तरीही सोनू कोहलीला सुरक्षा देतो.

दरम्यान, अनुष्का शर्माच्या गरोदरपणात सोनूने तिच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली होती. जेव्हा अनुष्का गरोदर होती आणि काम करत होती, तेव्हा सोनू तिच्या बाजूला पीपीई किट घातलेला दिसायचा.

सोनू सावलीसारखा नेहमीच अनुष्काबरोबर असतो आणि तिची सुरक्षा करतो.

बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचे बॉडीगार्डही बऱ्याचदा चर्चेत असतात. ज्याप्रमाणे सध्या अनुष्काच्या बॉडीगार्डची चर्चा आहे, त्याप्रमाणेच सलमान खानचा बॉडीगार्ड शेरादेखील कायम चर्चेत असतो. त्यालाही खान कुटुंबीय घरातील सदस्याप्रमाणे वागवतात. तो सलमानसोबत असतो आणि कायम त्याच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना दिसतो.

हे वाचा:   वाढदिवशीच दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; लवकरच हलणार घरात पाळणा?

सेलिब्रिटी त्यांच्या सुरक्षेबद्दल फार सजग असतात. त्यामुळे ते बॉडीगार्ड ठेवतात आणि त्यांच्यावर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. अनुष्का शर्मा सोनूला 1.2 कोटी रुपये पगार म्हणून देते. गेल्या अनेक वर्षांपासून सोनू अनुष्का शर्माचा बॉडीगार्ड आहे. विराट कोहलीचा बॉडीगार्ड वेगळा आहे, पण सोनू त्याचंही संरक्षण करताना दिसतो.

Leave a Reply