सडपातळ अनंत अंबानी पुन्हा कसा झाला इतका स्थूल ? `ही` असू शकतात कारणं

Uncategorized

रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश आणि नीता अंबानी (Mukesh Ambani- Nita Ambani) यांच्या मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा सारखपुडा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अंबानी कुटुंबातील या सोहळ्यातील क्षण या व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना पाहिला मिळतं आहे. अख्ख अंबानी कुटुंबासोबतच या उत्सवात बॉलिवूडमधील कलाकार, खेळाडू, अगदी राजकीय नेते मंडळीची मांदियाळी पाहिला मिळाली.

   

नवरी राधिका मर्चंट (Radhika Marchant) या सौंदर्यासोबत ईशा आणि नीता अंबानी यांनीही पारंपरिक वेशभूषाने सगळ्यांचं लक्ष वेधलं. सगळीकडे सध्या या सोहळ्याचीच चर्चा आहे. पण अनंत अंबानी यांच्या वाढलेल्या वजनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

108 किलो वजन कमी केलं होतं…

अनंत अंबानी हे 2013 मधील IPL मॅचदरम्यान ट्रॉफी घेताना वाढलेल्या वजनामुळे ट्रोल झाले होते. तेव्हा त्यांचे वजन 170 Kg एवढे होते. त्यामुळे अंबानी कुटुंब खूप नाराज झालं होतं. दुखावलेल्या अनंत अंबानी यांनी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. कोच विनोद चन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्दी डाएट आणि वर्कआऊटने अनंत यांनी 108 वजन कमी केलं. (Anant Ambani Engagement Weight loss and Weight gain video viral These reasons lead to weight gain again)

असं केलं वजन कमी 

अनंत अंबानी हे रोज 21 Km वॉकिंग करायचे. वजन कमी करण्यासाठी ते स्ट्रिक्ट डाएट फॉलो करत होते. याशिवाय 5 – 6 तास हेवी एक्सरसाइज करायचे. त्यासोबत योगा (Yoga), वेट ट्रेनिंग (Weight Training), फंक्शनल ट्रेनिंग (Functional Training), हाय इंटेन्सिटी (High Intensity) आणि कार्डियो वर्कआउट (Cardio Workout) हा त्यांचा रुटीनचा भाग होता. त्यांचा डाएटमध्ये साखरवर बंदी होती. लो कार्ब, मीडियम फॅट आणि हाय प्रोटिन डाएट ते फॉलो करत होते. 

हे वाचा:   आईच्या कडेवर असणारी ही चिमुकली आज मराठी सिनेसृष्टीवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

पण पुन्हा एकदा वजन वाढलं 

अनंत अंबानी यांना क्रॉनिक अस्थमामुळे हाय डोसची औषध आणि स्टेरॉइड (Steroids) घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांचे वजन प्रचंड वाढले होते. पण अनंत यांचं वजन पुन्हा एकदा वाढलं आहे. कदाचित जेवढं वजन कमी केलं होतं तेवढं वजन त्यांचं पुन्हा वाढलं आहे, असं जाणवतं आहे. 

ही असू शकतात कारणं

1. आरोग्य तज्ज्ञांनुसार कमी केलं वजन हे मेटन करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही जुन्या लाइफस्टाइल फॉलो केला तर तुमचं वजन पुन्हा वाढतं. 2. जेव्हा आपण फॅट लॉस करतो तेव्हा शरीरात भूक वाढविणारे हार्मोन्स वाढतात.

3. मसल्स लॉस केल्यामुळे मेटाबॉलिज्म स्लो होतो. त्यामुळे अशावेळी आपण साधरण खाणं पण खाल्ल तर आपलं वजन वाढतं. 

हे वाचा:   वयाच्या 14 व्या वर्षी पदार्पण, 17 व्या वर्षी लग्न करून इंडस्ट्री सोडली, 90 च्या दशकातील ही बिकिनी गर्ल 30 वर्षांनंतर कमबॅक करण्यास सज्ज!

4. 2003 च्या एका रिसर्चनुसार तरुणपणात डाइटिंग केल्यामुळे भविष्यात वजन वाढी आणि ईटिंग डिसऑर्डरचा धोका वाढतो. 

5. Eat this, Not That नुसार वजन कमी केल्यानंतर पहिलेसारखं खानेपिणे सुरु केल्यास वजन झपाट्याने वाढतं. 

6. जर कोणी खूप स्ट्रेस घेत असेल तर कार्टिलोस हार्मोन्स वाढतात,  ज्यामुळे वजन वाढण्याची समस्या होते. 

7. अनेक जण वजन कमी केल्यानंतर फिजिकल एक्टिविटी कमी किंवा बंदच करतात. त्यामुळेही कमी केलेलं वजन पुन्हा वाढू लागतं. 

8. अनेकांना काही आजार असतात ज्यामुळे त्यांना रोज अनेक औषधं घ्यावी लागतात, त्यामुळेही वजन वाढतं. 

Leave a Reply