Numerology: जन्मतारखेनुसार नक्की कसा जाईल तुमचा वर्षाचा पहिला आठवडा? अंकशास्त्र देतंय हे संकेत

Uncategorized

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 1 जानेवारी 2023 नंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

2023 या वर्षातील पहिला आठवडा कलाकार, संगीतकार, विद्यार्थी, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, राजकारणी आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळवून देणारा आहे. एकाच दिशेनं चॅनलायझिंग करण्यावर लक्ष केंद्रित करा. जी अविवाहित जोडपी लग्नासाठी पालकांच्या संमतीची वाट पाहत होती, त्यांना आता ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचारी आणि मध्यस्थांशी संवाद साधताना अडचण येईल. तुमचा बुद्ध्यांक उच्च राहील आणि तुमच्या यशात योगदान देईल. नफा आणि ब्रँड व्हॅल्यू मिळवण्यासाठी आयटी, ज्वेलरी, एक्सपोर्ट, सौर उत्पादनांची डीलरशीप, सरकारी असाइनमेंट, वैद्यकीय शिक्षण आणि मीडिया उद्योग क्षेत्रात आठवणीनं गुंतवणूक वाढवली पाहिजे.

शुभ रंग: नारंगी

शुभ दिवस: रविवार

शुभ अंक: 1

दान: मंदिरात केशर दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

प्रदीर्घ प्रलंबित वाद आणि तक्रारी संपवण्यासाठी एक परिपूर्ण आठवडा आहे. करिअर घडवण्यासाठी कुटुंब आणि मित्रांची मदत घ्या. स्वत:साठी आणि इतरांसाठी वेळ देण्याचं लक्षात ठेवा. सोमवारी शंकराला दुधानं अभिषेक करावा. प्रेम संबंधांमध्ये विश्वास असेल आणि त्यामुळे परस्पर बंध वाढतील. या आठवड्यात कुटुंब आणि नातेवाईकांसोबत पैसा आणि वेळ खर्च करा, कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहा, छोट्या ट्रिपची योजना करा, स्टॉकमध्ये गुंतवणूक करा आणि तुमच्या जोडीदाराला सरप्राईज गिफ्ट द्या.

शुभ रंग: अॅक्वा

शुभ दिवस: सोमवार

शुभ अंक: 2

दान: गरिबांना दूध दान करा.

#नंबर 3: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

घरात सजावटीसाठी धातूचं सामान ठेवणं टाळावं, त्याऐवजी लाकडी वस्तू वापराव्यात. विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून प्रोत्साहन आणि प्रगतीसाठी मार्गदर्शन मिळेल. सोशल नेटवर्किंगवर घालवलेला वैयक्तिक वेळ भविष्यातील वाढीसाठी उपयुक्त ठरू शकतं. व्यक्तिमत्व विकास तसेच उच्च शिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी हा आठवडा योग्य आहे. सरकारी प्रोजेक्ट्सशी निगडीत योजना आखल्यास त्या आठवड्याच्या उत्तरार्धात पूर्ण होऊ शकतात. सल्लागार, शिक्षक, गायक, प्रशिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि वकील यांच्यासाठी एक प्रभावी आठवडा आहे. वाद मिटवण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. पुस्तकं, सजावटीचं साहित्य, धान्य किंवा संगीत वाद्यांशी संबंधित व्यवसाय चांगला होईल. संगीतकार, हॉटेलिअर्स, जॉकी, लाइफ कोच, फायनान्सर्स आणि संगीतकारांना नफा आणि प्रगती मिळेल.

शुभ रंग: व्हॉयलेट

शुभ दिवस: गुरुवार

शुभ अंक: 3

दान: लहान मुलांना झाडांची रोपं दान करा.

हे वाचा:   मुलाखती दरम्यान, Aishwarya Rai चा सुटला ताबा कॅमेऱ्यासमोर पतीसोबत केलं असं काही की...

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

2023 हे वर्ष आणि पहिला आठवडा उत्पादन आणि राजकारणाच्या क्षेत्रात तुमची असीम क्षमता वापरण्याच्या अनेक संधी देतात. या आठवड्यात आर्थिक व्यवहार, नोकरीचा शोध, लग्नाचे प्रस्ताव, नवीन ऑर्डर किंवा परदेश प्रवास अशा अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राहुची शुद्ध उर्जा मिळवण्यासाठी चर्चेदरम्यान तुमच्या बोलण्यात सौम्यपणा ठेवण्याचं लक्षात ठेवा. कृषी आणि व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अनुकूल दिवस आहेत. बँक कर्मचारी, आयटी कर्मचारी, कलाकार किंवा अभिनेते, न्यूज अँकर्स आणि नर्तक गुंतवणूक करू शकतात. कारण, त्यांना फायदा मिळण्याची जास्त संधी आहे. हार्डवेअर, बांधकाम साहित्य, धातू आणि कपड्यांच्या उत्पादकांनी व्यवसायात नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. कृपया आपला परिसर नेहमी नीटनेटका आणि स्वच्छ ठेवा.

शुभ रंग: ग्रे

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक: 5 आणि 6

दान: प्राण्यांना मीठ घातलेलं अन्न दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

2023 हे वर्ष शहाणपणानं आणि चांगल्या वेळेनं परिपूर्ण असेल. श्रीगणेशाची पूजा करून आशीर्वाद घ्या. मीडिया, डिफेन्स, ट्रॅव्हल, थिएटर, खेळाडू आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती वरिष्ठांवर छाप पाडण्यास सक्षम असतील. या आठवड्यात जास्त आर्थिक नफा मिळेल. मालमत्तेतील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मॉडेलिंग, वैद्यकीय, क्रीडा, इव्हेंट्स क्षेत्रातील व्यक्तींनी ऑडिशन आणि मुलाखतींमध्ये नशीब आजमवा.

शुभ रंग: सी ग्रीन

शुभ दिवस: बुधवार

शुभ अंक: 5

दान: प्राण्यांना पाणी दान करा.

#नंबर 6: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

व्यावहारिक राहण्याची गरज आहे. त्यामुळे या आठवड्यात नातेसंबंधात भावनिक गडबड होईल. खरेदीसाठी आणि प्रिय जोडीदार, मित्र, पालक, मुलं किंवा नातेवाईकांसह प्रवास करण्यासाठी हा आठवडा घालवाल. जर तुम्ही आयटी किंवा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये असाल तर तुम्हाला नशीबाची साथ आणि स्थिरता मिळेल. तुम्ही मजबूत ब्रँड इमेज विकसित केल्यामुळे तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल. तुमची प्रतिभा इतरांना दाखवण्यासाठी करण्यासाठी मास कम्युनिकेशन हा सर्वोत्तम मार्ग आहे. संधी मिळण्यास वेळ लागेल. लग्नासाठी मिळणारे प्रस्ताव साधारण असतील त्यामुळे ते नाकारले पाहिजेत. गृहिणी, खेळाडू, प्रॉपर्टी डीलर्स, डर्माटॅलॉजिस्ट, गायक, डिझायनर, इव्हेंट मॅनेजर, ब्रोकर्स, शेफ आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवण्याची शक्यता आहे.

शुभ रंग: पिंक आणि अॅक्वा

शुभ दिवस: शुक्रवार

शुभ अंक: 6

दान: गरिबांना दूध दान करा

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

हे वाचा:   अखेर अरूंधतीनं दिली प्रेमाची कबुली, 'आई कुठे काय करते' मालिका रोमॅन्टिक वळणावर

खेळाडूंना सर्वात चांगले किंवा सर्वात वाईट दिवस दिसतील. त्यांनी जे घडेल ते स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. कामाच्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी टीम किंवा समूहाशी संवाद साधत रहा. कौटुंबिक जीवन सतत विकसित होईल. पण, सुसंवाद राखण्यासाठी वैयक्तिक नातेसंबंधांबाबत मोकळेपणानं बोला. मोठे वैयक्तिक निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला शंकर आणि केतूचा आशीर्वाद घेणं आवश्यक आहे. संधी स्वीकारण्यापूर्वी कायदेशीर पैलूंचं विश्लेषण करा. बॉसच्या सूचना काळजीपूर्वक ऐका आणि त्यांचं पालन करा. भोग टाळा. संरक्षण, कायदा, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि शास्त्रज्ञ, राजकारणी, नाट्य कलाकार, सीए, अभिनेते यांना नशिबाची विशेष साथ मिळेल.

शुभ रंग: पीच

शुभ दिवस: सोमवार

शुभ अंक: 7

दान: गरजूंना स्टीलची भांडी दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.).

हे वर्ष डेडीकेशनच्या माध्यमातून सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी आहे. हा आठवडा अशा अनेक संधी देईल. सरकारी कंपन्यांशी असलेला तुमचा संबंध चांगला परतावा मिळवून देईल. म्हणून त्यादृष्टीनं तयारी करा. आर्थिक लाभ जास्त होतील आणि शेतजमीन व यंत्रसामग्री खरेदीशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने वळतील. आरोग्याची काळजी घेणं, अनेक जबाबदाऱ्या आणि कायदेशीर विवाद टाळणं गरजेचं आहे. डॉक्टर आणि उत्पादकांना मिळालेल्या यशाबद्दल सन्मानित वाटेल. वैयक्तिकरित्या भागीदारांशी वाद होण्याची शक्यता असल्यानं आपलं डोके शांत ठेवा. धान्य दान आणि व्यायामाचा अवलंब करावा.

शुभ रंग: व्हॉयलेट

शुभ दिवस: शुक्रवार

शुभ अंक: 6

दान: गरजूंना कपडे दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आठवडा फार लवकरच संपत असल्यासारखं वाटेल. तुम्हाला यश आणि आनंद मिळेल. या आठवड्यात शक्य तितक्या सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहा आणि प्रवास करा. विश्वास संपादन करण्यासाठी आपल्या जोडीदाराशी मनातील भावना शेअर करा. शेअर बाजार आणि प्रशिक्षण व्यवसायात झपाट्यानं वाढ होईल. जोडपी आनंदी आणि रोमँटिक मूडमध्ये राहतील. तुमची इमेज खराब होईल म्हणून तुम्ही अल्कोहोलपासून दूर राहिल पाहिजे. प्रेमात असलेल्यांसाठी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी चांगला काळ आहे. व्यावसायिक संबंध आणि डिल्स लवकरच पूर्ण होतील. डिझाईन, एक्सपोर्ट-इम्पोर्ट, लेखन, ग्लॅमर इंडस्ट्री आणि मीडिया क्षेत्रातील व्यक्ती प्रसिद्धी मिळवतील. राजकारणी मोठ्या संधींची पूर्तता करतील. त्यामुळे पब्लिक फिगर्स आणि विद्यार्थ्यांनी सहयोग आणि प्रगती साधण्यासाठी या वेळेचा उपयोग केला पाहिजे. विद्यार्थी, प्रशिक्षक, संगीतकार, लेखक, डिझायनर्स, डॉक्टर, वकील, इंजिनीअर्स आणि अभिनेत्यांना लोकप्रियतेचा आनंद घेता येईल.

शुभ रंग: पिंक

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक: 9

दान: स्त्रियांना बांगड्या दान करा.

Leave a Reply