ऐश्वर्या रायचं अभिषेकवर धक्कादायक वक्तव्य म्हणाली, `माझं त्याच्यावर कधीच…`

Uncategorized

ऐश्वर्या रायचं अभिषेकवर धक्कादायक वक्तव्य म्हणाली, `माझं त्याच्यावर कधीच…`अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहरा आहेत. ऐश्वर्या रायने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांनाच वेड लावले आहे. तिने बॉलिवूडमध्ये अनेक हीट सिनेमे दिले. ज्यानंतर अखेर 2007 मध्ये ती अभिनेता अभिषेक बच्चनसोबत विवाह बंधनात अडकली.

   

अभिषेक बच्चनने देखील अनेक चांगले चित्रपटं दिली, ज्यानंतर आता तो वेबसिरीजसाठी काम करत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या या दोघांना एक मुलगी आहे आणि हे दोघेही एका सुंदर कुटुंबाप्रामाणे आनंदाने राहात आहे.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे आजच्या बॉलीवूडमधील सर्वात प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांना इंडस्ट्रीचं पॉवर कपल असंही म्हणतात. अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये शाही पद्धतीने लग्न केलं होतं. या लग्नात बॉलिवूडचे सर्व मोठे स्टार्स सहभागी झाले होते. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही दोघंही आजच्या पिढीला कपल गोल्स देताना दिसतात. अभिषेक आणि ऐश्वर्याची प्रेमकहाणी फिल्मी असेल पण तुम्हाला माहित आहे का की अभिषेक कधीच ऐश्वर्याचा क्रश नव्हता.

हे वाचा:   अंजली अरोराने बाथरूममध्ये कपडे काढून केला डान्स , पाहा नवीन व्हिडिओ व्हायरल

ऐश्वर्याचं अभिषेकवर क्रश नव्हतं


ऐश्वर्या राय 2016 मध्ये करण सिंह छाबरा यांच्या टॉक शोमध्ये पोहोचली होती. या टॉक शोमध्ये अभिनेत्रीने अनेक खुलासे केले आहेत. आणि या शोमध्ये, जेव्हा ऐश्वर्याला विचारण्यात आलं की, तिचा कधी अभिषेक बच्चन किंवा तिच्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीवर क्रश आहे का? यावर ऐश्वर्याने उत्तर देत म्हटलं की, “‘मी विवाहित आहे आणि माझा नवरा माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. पण माझा त्याच्यावर कधीच क्रश नव्हतं. आम्ही मित्र होतो. मी त्याच्याशी लग्न केलं तेव्हाही मला तसं वाटलं नाही. किंवा कॉलेजमध्ये माझ्यापेक्षा लहान कोणत्याही माणसावर कधीच क्रश नव्हता. “.

अभिषेक आणि ऐश्वर्याची प्रेमकहाणी ‘ढाई अक्षर प्रेम के’ चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. 2021 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना अभिषेकने सांगितलं की, 1997 मध्ये ‘और प्यार हो गया’च्या शूटिंगदरम्यान तो ऐश्वर्याला पहिल्यांदा भेटला होता. तो तिथे प्रॉडक्शन बॉय म्हणून उपस्थित होता. यादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि पहिल्या भेटीनंतरच तो ऐश्वर्यावर फिदा झाला.

Leave a Reply