गौरी व जयदीपचा ऑनस्क्रीन रोमान्स पाहून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेवर प्रेक्षकांचा संताप, म्हणाले “आमच्या मुलांवर…”

Uncategorized

छोट्या पडद्यावरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका रंजक वळणावर आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील जयदीप व गौरीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. विभक्त झालेले गौरी व जय मुलगी लक्ष्मीमुळे कित्येक वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत.

   

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत गौरी व जयदीप जवळ आल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यांचा रोमँटिक व्हिडीओ स्टार प्रवाहच्या ऑफिशिअल पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. परंतु, हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक संतापले आहेत. गौरी व जयदीपचा ऑनस्क्रीन रोमान्स प्रेक्षकांच्या पसंतीस न उतरल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांनी या व्हिडीओवर कमेंट करत सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील या व्हिडीओवर आक्षेप घेतला आहे.

गौरी व जयदीपचा रोमान्स पाहून प्रेक्षकांचा राग अनावर झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका प्रेक्षकाने कमेंट करत “आम्ही कुटुंबाबरोबर मालिका बघतो. त्यामुळे तसेच सीन्स दाखवले गेले पाहिजेत. थोडी हिंट दिली तरी सगळ्यांना समजतं पुढे काय होणार आहे. हे असे रोमँटिक सीन जाखवत जाऊ नका”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “बालकलाकार मालिकेत असल्यामुळे आमची मुलंही मालिका बघतात. त्यामुळे असे सीन दाखवत जाऊ नका”, अशी कमेंट केली आहे.

हे वाचा:   या प्रसिद्ध अभिनेत्याने चालू कॅमेऱ्यासमोरच रेखा यांना केलं होतं जबरदस्ती किस; धक्कादायक होतं कारण

“एवढं सगळं दाखवायची गरज नाही” असंही एका प्रेक्षकाने म्हटलं आहे. तर आणखी एकाने कमेंट करत “मराठी मालिकेत फालतूपणा का दाखवत आहेत”, असंही म्हटलं आहे. तर काही जणांनी मालिकेच्या कथानकाची गरज असल्याचं म्हटलं आहे.

‘सुख म्हणजे काय असते’ मालिकेत अभिनेत्री गिरिजा प्रभू गौरीची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता मंदार जाधव जयदीपच्या भूमिकेत आहे. बालकलाकार साईशा साळवी गौरी व जयदीपची मुलगी लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. वर्षा उसगावकर, माधवी निमकर, सुनील गोडसे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Leave a Reply