जर्मनीला शिक्षणासाठी गेला, आईसाठी सून घेऊन आला… अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा

Uncategorized

भारतातला एक मुलगा जर्मनीत (Germany) अभ्यासासाठी गेला आणि येताना आईसाठी सून घेऊन आला. या अनोख्या लव्हस्टोरीची (Love Story) सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा रंगली आहे. पहिल्याच भेटीत एकमेकांवर त्या दोघांचा जीव जडला आणि जर्मनीतल्या मुलीने (German girl) भारतातल्या मुलाशी लग्नही केलं. यानंतर ती त्या मुलाबरोबर भारतात आली इथली संस्कृती पाहून ती खूपच प्रभावित झाली आहे.

   

सुमित असं या तरुणाचं नाव आहे. मुळचा हरियाणाचा (Haryana) असलेला सुमित अभ्यासानिमित्ताने जर्मनी गेला होता. तिथल्या एका रेल्वे स्टेशनवर त्याची ओळख पियामलीना या तरुणीशी झाली. पहिल्या भेटीतच या दोघांचा एकमेकांवर जीव जडला. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबरही शेअर केले आणि त्यांच्यात बातचित वाढली. दोन वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांनीही आपापल्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सुमित आणि पियामलीना यांनी कुटुंबांच्या संमतीने कोर्टात लग्न केलं.

हे वाचा:   आलिया भट्ट दुसऱ्यांदा आई होणार? बेबी बंपच्या छायाचित्रातून उघड झाले सारे रहस्य

लग्नानंर दोघंही भारतात आले. भारतात आल्यावर इथली संस्कृती, इथल्या लोकांची ती प्रेमातच पडली. हरियाणातील जीवनशैली पाहून ती प्रचंड प्रभावित झाली आहे. सुमितच्या कुटुंबियांना इंग्रजी येत नाही तर पियामलीनाला हिंदी बोलता येत नाही. त्यामुळे थोडीशी अडचण होते, पण एकमेकांच्या भावना ते समजून घेतात, असं सुमितने सांगितलं.

भारतीय नागरिक, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि बॉलिवूड चित्रपट पियामलीनाला प्रचंड आवडतात. त्यामुळे पहिल्याच भेटीत तिला सुमित आवडू लागला होता. दोन वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. या लग्नाने सुमितचं कुटुंबिय खुश आहे. त्यांनी पीयामलीनावर कोणतंही बंधन लादलेलं नाही. विशेष म्हणजे जर्मन सुनेला पाहण्यासाठी गावातील आणि आसपासच्या गावातील अनेकजण सुमितच्या घराला भेट देतात.

Leave a Reply