“त्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला”; सपना गिलचा पृथ्वी शॉवर गंभीर आरोप

Uncategorized

तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर सपना गिलनं क्रिकेटर पृश्वी शॉवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आपल्याला मारहाण करत प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचा खळबळजनक आरोप तिने केले आहेत. त्यामुळं पृश्वी शॉच्या अडचणी वाढल्या आहेत.

   

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिलनं म्हटलं, “मी कोणालाही मारहाण केलेली नाही तसेच आम्ही पैसेही मागितलेले नाहीत. त्यांनी आमच्यावर चुकीचे आरोप केले आहेत. मी सेल्फीसाठीही कधी विचारलेलं नाही. आम्ही आमचं एन्जॉय करत होतो. यावेळी आमचे अनेक मित्र व्हिडिओ काढत होते. त्याचवेळी मी पाहिलं की पृश्वी शॉ आणि त्याचे मित्र माझ्या मित्रा मारहाण करत होते”

“आम्ही त्यांना थांबवण्यासाठी तिथे गेलो. यावेळी पुराव्यासाठी माझा मित्र याचा व्हिडिओ काढत होता. माझ्या मित्राला मी वाचवायला धावले तर त्यांनी मला बेसबॉलनं मारलं. तसेच एक ते दोन लोकांनी मला मारहाण केली आणि माझ्या प्रायव्हेट पार्टला त्यांनी स्पर्श केला. तसेच माझ्या कानाखाली देखील मारली”

हे वाचा:   सौदामिनी, आधी कुंकू लाव! ‘टिकली’ प्रकरणात लुकतूकेंचे मिम्स तुफान व्हायरल, विरोधाला विनोदाची फोडणी

या घटनेनंतर आम्ही त्यांना एअरपोर्टवर थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पृथ्वी आणि त्याच्या मित्रांनी गर्दी गोळा केली आणि पळून गेले. ते खूपच आक्रमक होते आणि दारु प्यायलेले होते. त्यांनी आमच्याकडं दिलगिरी देखील व्यक्त केली. पण १६ फेब्रुवारी रोजी मला कळलं की माझ्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. त्यामुळं मग मी देखील २० फेब्रुवारी तक्रार दाखल केली, असंही सपना गिलनं सांगितलं.

Leave a Reply