मोर कधी संभोग नाही करत, अश्रू पिऊन प्रेग्‍नेंट होते लांडोर? जया किशोरींच्या दाव्यातील तत्थ काय

Uncategorized

सध्या देशात जया किशोरीला कोण ओळखत नाही. आज-काल त्यांच्या विशेष कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांच्या कथा आणि प्रेरणादायी भाषणं लाखो लोक ऐकतात. काही महिन्यांपूर्वी जया किशोरी यांनी एक कथा सांगताना दावा केला होता की, मोर आणि लांडोर यांचा कधी शारीरिक संबंध येत नसतो. मोराचे अश्रू पिऊन लांडोर गरोदर होते. जया किशोरीच्या या दाव्यात कितपत तथ्य आहे, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला. जया किशोरींनी दावा केल्याप्रमाणे लांडोर खरोखरच तशी गरोदर होते का?

   

जया किशोरी या सुप्रसिद्ध प्रेरक वक्त्या आणि कथाकार आहेत. मोठ्या संख्येने लोकांवर त्याचा प्रभाव आहे. सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्याच्या बोलण्याचाही खूप प्रभाव आहे. त्यांच्या प्रेरक भाषणाने कितीतरी भरकटलेल्या लोकांना योग्य रस्ता दाखवल्याचे सांगितले जाते.

हे वाचा:   “१०० कोटी देतो, कुत्र्याबरोबर सेक्स…”, आहाना कुमराने साजिद खानवर केले होते गंभीर आरोप

काही महिन्यांपूर्वी जया किशोरी यांनी कथा सांगताना दावा केला होता की मोर आणि लांडोर कधीच शारीरिक संबंध ठेवत नाहीत. मोराचे अश्रू पिऊन लांडोर गरोदर होते. त्यांच्या या दाव्यावर वेगवेगळ्या लोकांनी आपली मते मांडली होती. आज न्यूज 18 लोकमत त्यांच्या दाव्याची सत्यता सांगणार आहे.

जया किशोरी यांनी त्यांच्या एका सभेत सांगितले होते की, मोर आणि लांडोर यांचा कधीच शारीरिक संबंध येत नसतो. त्या पुढे म्हणाल्या की, अशा परिस्थितीत तुम्ही विचार करत असाल की मोरांना मग अपत्य कशी होतात? याच सभेत त्या पुढे म्हणाल्या होत्या की, मोराचे अश्रू पिऊन लांडोरीची गर्भधारणा होते. याच कारणामुळे भगवान श्रीकृष्ण मोराची पिसे धारण करतात.

त्यामुळे जया किशोरींच्या या दाव्यात किती तत्थ आहे, असा प्रश्न उपस्थित झाला. मोराचे अश्रू पिऊन मोराची गर्भधारणा होते का? विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या दाव्यात अजिबात तथ्य नाही. मोर-लांडोर शारीरिक संबंध प्रस्थापित करतात, त्यानंतर लांडोरीची गर्भधारणा होते.

हे वाचा:   मिस वर्ल्ड जिंकली तेव्हा अशी दिसायची ऐश्वर्या राय; अभिषेकचा तेव्हाचा फोटो पाहाल तर म्हणाल ...

मोर आणि लांडोर प्रेमाच्या मुद्रेत अनेकदा दिसले आहेत. जया किशोरी यांच्या आधी एकाने मोर हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळेच त्याला राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा दिला आहे, असं म्हटलं होतं. मात्र, तसं बिलकूल नाही. ही दंतकथा पूर्णपणे श्रद्धांवर आधारित आहे.

सुप्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार विजय गोयल यांनी मोर-लांडोर यांच्या संभोगाची छायाचित्रे टिपली आहेत आणि ती सोशल साइट्सवरही शेअर केली आहेत. पक्ष्यांना शारीरिक संबंधांसाठी 15 सेकंद लागतात. या दरम्यान, मोराचे शुक्राणू लांडोरीमध्ये हस्तांतरित करतात, ज्यामुळे मोराची गर्भधारणा होते.

Leave a Reply