श्रीदेवीशी जोडलं जात होतं जितेंद्र यांचं नाव, अभिनेत्रीला घरी आणलं अन् पत्नीसमोर…

Uncategorized

अभिनेत्री श्रीदेवी एकेकाळच्या सुपरस्टार होत्या. ७०-८०च्या दशकात प्रत्येक नावाजलेला दिग्दर्शक आणि निर्माता त्यांच्याबरोबर काम करू इच्छित होता. श्रीदेवींनी आपल्या चित्रपटात काम करावं असं प्रत्येकला वाटत होतं. अशातच अभिनेते जितेंद्र यांच्याशी श्रीदेवी यांचं नाव जोडलं जाऊ लागलं होतं. जितेंद्र तर श्रीदेवी यांच्याबरोबर काम करण्यासाठी अनेक निर्मात्यांना त्याचं नाव सुचवत असत. ज्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. ज्यामुळे पुढे दोघांच्याही खासगी आयुष्यात वादळ आलं.

   

अभिनेते जितेंद्र आणि श्रीदेवी यांनी ‘हिंमतवाला’, ‘जानी दोस्त’, आणि ‘जस्टिस चौधरी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. दोघं ज्या चित्रपटात काम केलं तो प्रत्येक चित्रपट हिट होण्यासाठी त्यांची केमिस्ट्री पुरेशी होती. १९८३ मध्ये जेव्हा ‘हिंमतवाला’ चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा या जोडीला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. याच चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी या दोघांच्या लिंकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. काही मीडिया रिपोर्टनुसार शूटिंगच्या वेळी श्रीदेवी आणि जितेंद्र एकत्रच राहायचे.

हे वाचा:   तीन दिवस एकीसोबत; तीन दिवस दुसरीसोबत; २ बायकांकडून नवऱ्याची वाटणी; रविवारचं काय? फैसला झाला

मीडिया रिपोर्टनुसार श्रीदेवी आणि जितेंद्र जेव्हा ‘हिंमतवाला’साठी काम करत होते तेव्हा दिग्दर्शक राघवेंद्र राव यांच्याकडे जितेंद्र यांनी श्रीदेवी यांना चित्रपटात घेण्याची शिफारस केली होती. चित्रपट हिट झाला आणि या जोडीची खूप चर्चा झाली. पण त्यानंतर बी-टाऊनमध्ये या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या.

श्रीदेवी यांचं नाव जितेंद्र यांच्याशी जोडलं जाऊ लागलं. तरीही जितेंद्र प्रत्येकवेळी कास्टिंगसाठी श्रीदेवी यांचं नाव सुचवत होते. जेव्हा ही गोष्टी जितेंद्र यांची पत्नी शोभा यांना समजली तेव्हा मात्र जितेंद्र यांच्या खासगी आयुष्यात वादळ उठलं. त्यामुळे जितेंद्र यांनी श्रीदेवींना थेट आपल्या घरी नेऊन पत्नीसमोर उभं केलं.

जितेंद्र यांनी श्रीदेवी यांच्याबरोबरच्या अफेअरचं सत्य सांगण्यासाठी त्यांना घरी घेऊन आले होते. पण पाहता पाहता श्रीदेवी आणि शोभा एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी झाल्या. एका मुलाखतीत श्रीदेवी यांनी या अफेअरच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, “मी अशी मुलगी नाही जी कोणाचा संसार उध्वस्त करून स्वतःचा संसार उभा करेन. मी साधी-सरळ मुलगी आहे पण मुर्ख नाही. माझ्या आयुष्यात मी प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेते.” अर्थात काही वर्षांनंतर श्रीदेवी यांनी आधीच विवाहित असलेले निर्माते बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं होतं.

Leave a Reply