सपना गिलने वाढवल्या पृथ्वी शॉच्या अडचणी, गंभीर आरोप करत विविध कलमांखाली दिली तक्रार

Uncategorized

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉबरोबर केलेल्या कथित गैरवर्तन आणि त्याच्या कारवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला केल्याप्रकरणी सपना गिल आणि इतर तीन आरोपींनी सोमवारी मुंबईतील एका स्थानिक कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, जामिनावर बाहेर येताच सपना हिने पृथ्वी शॉच्या अडचणी वाढवण्यास सुरुवात केली आहे. तिने पोलिसांकडे पृथ्वी शॉविरोधात अनेक कलमांखाली तक्रार दिली आहे. त्यामुळे पुढच्या काळात पृथ्वी शॉसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

   

मिळालेल्या माहितीनुसार जामिनावर बाहेर आल्यानंतर सपना गिल हिने पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राविरोधात तक्रार नोंदवली आहे. सपना हिने ही तक्रार मुंबईतील एअरपोर्ट पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली आहे. या तक्रारीमध्ये पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रावर आधी भांडणासाठी डिवचल्याचा, मारहाण केल्याचा आणि इतर काही आरोप केले आहेत. सपना गिल हिने कलम १५४, ३२६ ए, ३२६ बी, ३५४, ३५४ बी, ३७०, ३७० ए, ३७६ डीबी, ३७६, ३७६ ई आणि ५०९ या कलमांतर्गत तक्रार नोंदवली आहे.

हे वाचा:   तनुश्री दत्ता हिच्या निशाण्यावर पुन्हा एकदा नाना पाटेकर, पोस्ट शेअर करत म्हटले की…

याआधी सपना गिलसह आठ लोकांवर पृथ्वी शॉसोबत गैरवर्तन करण्याचा, कारवर हल्ला केल्याचा आणि या प्रकरणाला मिटवून टाकण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना आधी रिमांडवर घेतले होते. पोलीस रिमांड संपल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी आरोपींना न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने सर्व ८ आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. मात्र त्यानंतर सपना गिल हिने जामिनासाठी अर्ज केल्यावर तिची १० हजाराजांच्या हमीवर जामिनावर मुक्तता करण्यात आली.

Leave a Reply