८५ वर्षाचा म्हातारा, त्याच्या प्रेमात २४ वर्षाची तरुणी, तिची पुढची इच्छा आपण न ऐकलेली बरी

Uncategorized

असं म्हणतात की, प्रेम आंधळ असतं. जाती-पातीचं प्रेमाला बंधन नसतं. प्रेम कुणालाही कोणत्याही वयात केव्हाही होऊ शकते. आता अनोखी प्रेम कहाणी चर्चेत आली. २४ वर्षांची एक मुलगी ८५ वर्षीय आजोबाच्या प्रेमात पडली. दोघेही गेल्या तीन वर्षांपासून एकदुसऱ्याच्या प्रेमात पडले. आता ही २४ वर्षीय युवती म्हणते, ८५ वर्षीय व्यक्तीच्या मुलाची मला आई व्हायचं आहे. अमेरिकेच्या मिसीसीपीत राहणारी २४ वर्षीय मिरेकल स्वतःपेक्षा ६१ वर्षांनी जास्त वयाच्या ८५ वर्षीय चार्ल्स पोग यांच्या प्रेमात पडली. आता दोघेही फॅमिली प्लॅनिंग करत आहेत. मिरेकलचं म्हणणं आहे की, आयव्हीएफच्या माध्यमातून तिला मुलाला जन्म द्यायचा आहे.

   

मिरेकलला नर्स म्हणून ठेवलं

मिरेकलची पहिली भेट रिअल इस्टेट एजंट चार्ल्ससोबत २०१९ मध्ये झाली. चार्ल्ससोबतच्या रिलेशनशिपमुळं तिला कित्तेकांनी सुनावलं. प्रेम करण्यासाठी आजोबा मिळाले का, असंही लोकं तिला बोलत होते. त्यांच्या देखरेखीसाठी कुणीचं नव्हते. चार्ल्सने मिरेकलला नर्स म्हणून ठेवलं. आजोबाच्या वयाच्या चार्ल्सचं मिरेकलवर प्रेम झालं. फेब्रुवारी २०२० मध्ये मिरेकलसोबतची आपली भावना व्यक्त केली.

हे वाचा:   रेखा म्हणाली, जर महिलांना एखाद्या पुरुषासोबत संबंध ठेवायचे असतील तर त्या त्याच्यासोबत…

नात्याला आईचा विरोध नाही

मिरेकलनं सांगितल्यानुसार, तिची ४५ वर्षीय आई तामिका फिलिप्स आणि ७२ वर्षीय आजोबा जो ब्राऊनला चार्ल्ससोबतच्या रिलेशनशीपला विरोध नाही. कारण चार्ल्स तिची काळजी घेतात. परंतु, वडील करीम फिलिप्स यांनी मुलीच्या अशा रिलेशनशीपला विरोध केला. तिच्या वडिलांनी या नात्याला अद्याप मनापासून स्वीकारलं नाही.

चार्ल्सच्या मुलाची आई होण्याचं स्वप्न

मिरेकल म्हणाली, चार्ल्स १०० वर्षांचे आहेत की, ५५ चे याच्याशी माझे काही देणेघेणे नाही. ते माझ्यासाठी सुपरअॅक्टिव्ह आहेत. मिरेकल आणि चार्ल्स यांनी गेल्या जुलै महिन्यात लग्न केलं. आता मिरेकल म्हणते, मला कुटुंब वाढवायचं आहे. चार्ल्सची वय ८० वर्षे आहे. तरीही चार्ल्सच्या मुलाची आई होण्याचं तिचं स्वप्न आहे. या अनोख्या प्रेमकहाणीची चर्चा जोरात सुरू आहे. काही लोकं टीका करत आहेत. पण, मिरेकल मात्र, आपल्या मतावर ठाम आहे.

Leave a Reply