28 वर्षांपूर्वीच ठरलं होतं सलमानचं लग्न; पत्रिकाही छापल्या, पण होणाऱ्या बायकोनं दिला दगा?

Uncategorized

भाईजान लग्न का करत नाही असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण सलमानचं लग्न ठरलं होतं. कोणाशी आणि कधी? जाणून घ्या

   

बॉलिवूडचा भाईजान आजही सिंगल आहे. सलमाननं अजूनही लग्न का केलं नाही असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना अनेकदा पडला असेल.

सलमान खानचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं.पण 28 वर्षांपूर्वीच सलमान खानचं लग्न ठरलं होतं. नुसतं लग्न नाही तर लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या.

मिस इंडिया संगीता बिजलानीबरोबर सलमान खान रिलेशनशिपमध्ये होता.माॅडेल ते बाॅलिवूड अभिनेत्री असा संगीताचा प्रवास होता. ज्यात सलमानबरोबरच्या रिलेशनमुळे ती चांगलीच चर्चेत आली.

संगीता सलमानचं नातं खास होतं. सलमान संगीतावर प्रचंड प्रेम करायचं. नातं लग्नापर्यंत पोहोचलं होतं.

संगीता आणि सलमान यांच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापण्यात आल्या.27 मे 1994ही सलमान आणि संगीता यांच्या लग्नाची तारीख होती. पण लग्नाच्या महिनाभर आधी संगीतानं सलमानवर फसवणुकीचा आरोप केला.

हे वाचा:   दिवाळीच्या या दिवशी पाकिटात गुपचूप ठेवा ही 1 वस्तू; पाकीट नेहमी भरलेलं राहील..लक्ष्मी सदैव सोबत राहील..जाणून घ्या

अभिनेत्री सोमी अली आमच्या मध्ये आली असं संगीतानं इंडिया टुडेच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.सलमानबरोबरचं लग्न तुटल्यानंतर संगीतानं भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन अजहरुद्दीनबरोबर लग्न केलं. 2010मध्ये त्यांचं नातं संपुष्टात आलं.

28 वर्षांनंतरही संगीता आणि सलमान एकमेकांचे घट्ट मित्र आहेत.सलमान खानच्या बर्थ डेला किंवा इतर महत्त्वाच्या क्षणी संगीत बिजलानी हजर असते.

Leave a Reply