Instagram वरुन ओळख झालेल्या तरुणाच्या प्रेमात पडली 2 मुलांची आई; प्रियकरबरोबर पळून गेली पण…

Uncategorized

प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हटलं जातं. बरं प्रेमाला जातपात, वय, वर्ण याचं काही बंधन नसतं असंही म्हणतात. प्रेमात अंधळं होणं आणि प्रेमासाठी काहीही करण्याची तयारी यासारख्या प्रकरणांमधून घडणारी अनेक प्रकरण या ना त्या कारणाने चर्चेत असतात. सध्या असेच एक प्रकरण झारखंडमध्ये (Jharkhand) चर्चेत आहे. येथील पोटकामध्ये (Potka) एक प्रेम प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे.

   

नवऱ्याने दाखल केली लेखी तक्रार

झालं असं की, पोटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी 2 मुलांची आई असलेली एक महिला तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली आहे. चार दिवसांपूर्वी ही महिला घर सोडून पळून गेली आहे. या प्रकरणामध्ये या महिलेच्या पतीने पोलीस स्टेनमध्ये धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे. पोटका पोलिसांनीही अशी तक्रार दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हे वाचा:   प्रार्थनाच्या त्या व्हिडिओनं पोरांची उडवली झोप.. अंथरूणातच..

दोघांनी केलं सरेंडर

फरार झालेल्या महिलेच्या पतीने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये पत्नीचं एका व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध होते अशी शंका व्यक्त केली आहे. यासंदर्भात तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या पळून गेलेल्या दोघांशी संवाद साधून त्यांच्यावर दबाव टाकल्यानंतर त्यांनी शुक्रवारी गालूडीह पोलीस स्टेनमध्ये येऊन स्वत:ला पोलिसांच्या हवाली केलं आहे. यानंतर या दोघांना पोटका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं.

15 वर्षांपूर्वी झालेलं लग्न

संबंधित महिलेचं लग्न 15 वर्षांपूर्वी ओडिशामधील रायरंगपूरमधील एका व्यक्तीशी झालं. या महिलेच्या प्रेम कथेची सुरुवात जवळजवळ 6 महिन्यांपूर्वी झाली. 6 महिन्यांपूर्वी या महिलेची ओळख गालूडीह येथील पायरागुडी येथील रहिवाशी असलेल्या गोपेश्वर भगत या तरुणाबरोबर झाली. इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल नेटवर्किंग साईटवरुन हे दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. दोघेही एकमेकांशी संवाद साधू लागले. खासगी आयुष्याबद्दल माहितीची देवाणघेवाण करताना दोघांना एकमेकांचा आधार वाटू लागला. त्यातूनच हे दोघे प्रेमात पडले. 

हे वाचा:   आईला फोन केला म्हणून... बापाचं पोटच्या मुलीसोबत निर्दयी कृत्य, बीड हादरलं

नातेवाईक असतानाच पोलीस स्टेशनला सरेंडर

दोघांनीही पळून जाण्याचं ठरवलं. त्यानंतर दोघेही योग्य संधी साधून पळून गेले. पत्नी घरातून पळून गेल्याचं पतीच्या लक्षात आल्यानंतर त्याने पोलीस स्टेनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सरेंडर होण्यास सांगितलं. दोघेही त्याच दिवशी सायंकाळी सरेंडर झाले. यावेळी दोघांचेही नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते. 

नवऱ्याने केले गंभीर आरोप

प्रियकराला सोडून पुन्हा आपल्या मुलांकडे आणि पतीकडे या महिलेने परत यावं असं मत दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी नोंदवलं. मात्र पतीने आपल्या पत्नीवर एक लाख रुपये रोख आणि 2 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घरातून पळून जाताना घेऊन गेल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणात परस्परांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply