नागा चैतन्य आणि समंथा हे कपल केवळ, साऊथ इंडस्ट्रीमध्येच नाही तर संपूर्ण देशात लोकप्रिय होतं. या जोडीचे असंख्य चाहते होते. सुरुवातीला काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर, त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते तर खूपच उत्सुक होते. २०१७मध्ये त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. पण काहीच दिवसांमध्ये त्याच्यात वाद सुरु असल्याच्या बातम्या देखील समोर येऊ लागल्या.
यानंतर एक दिवशी अचानक समंथाने आपल्या ट्विटर आणि इतर सोशल मीडिया अकाउंट वरून आपलं सासरचं आडनाव काढून टाकलं. त्यानंतर मात्र या दोघांमध्ये बिनसल्याच्या बातम्या समोर येवू लागल्या. यानंतर काहीच दिवसात या जोडप्याने वेगळं होण्याच्या निर्णयाने सगळ्यांनाच मोठा धक्का दिला. त्यांचे असंख्य चाहते त्यांच्या या निर्णयानंतर दुखावले .
घटस्फोटानंतर पोटगी घेण्यासही समंथाने नकार दिला. मात्र, समंथा आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आता समंथाने बाळाबद्दल तिचं मत सांगितलं आहे. तिला एका मुलाखतीत तिला बबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर सामंथा म्हणाली, ”माझ्या मनात बाळाबद्दल काही गोष्टी ठरलेल्या आहेत”, असं समंथा म्हणाली आहे.
”हे खरं आहे आताच माझा घटस्फोट झालाय. पण माझ्या मनात बाळाबद्दल काही गोष्टी ठरलेल्या आहेत. वैयक्तिक कारणांमुळे माझा प्लॅन लांबणीवर पडला आहे. पण मी बाळाला जन्म देण्यासाठी उत्सुक आहे”, असं समंथा या मुलाखती दरम्यान म्हणाली.
समंथाने लग्नातली साडी नागा चैतन्यला परत केल्याचीही बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. समंथाने लग्नात नागा चैतन्यची आजी डी. राजेश्वरी यांची साडी परिधान केली होती. हीच साडी तिने आता नागा चैतन्यला परत केल्याचं कळतंय. 2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं.
त्यानंतर समंथाने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून अक्किनेनी हे आडनावसुद्धा काढून टाकलं. नागा चैतन्यला अनफॉलोही केलं. 6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नागा चैतन्यने लग्नगाठ बांधली होती. या दोघांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच आहे. दोघं जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना भेटले, तेव्हा दोघंही दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होते.