रविना टंडनवर ‘या’ कारणासाठी भडकलेला अजय देवगण; म्हणाला “ही बाई म्हणजे एक नंबरची…”

Uncategorized

मनावर राज्य करणारी अभिनेत्री रवीना टंडन आजही चांगलीच चर्चेत असते. ९० च्या दशकातील काही ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये रवीनाचं नाव घेतलं जायचं. आताही काही चित्रपट आणि वेबसीरिजमधून रवीनाने उत्तम काम करत स्वतःला पुन्हा सिद्ध केलं आहे. चित्रपटाबरोबरच रवीनाच्या खासगी आयुष्याबद्दलही बरीच चर्चा झाली. अक्षय कुमारबरोबर रवीनाच्या नात्याची चांगलीच चर्चा झाली.

   

अक्षयनंतर रवीनाचं नाव अजय देवगणशीही जोडलं गेलं होतं. अजय देवगण आणि रवीना टंडन यांची जोडी ‘दिलवाले’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली. प्रेक्षकांना यांची जोडी खूप भावली. नंतर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चासुद्धा होत होती. मध्यंतरी रवीना टंडनने एका मुलाखतीमध्ये याबद्दल खुलासाही केला होता. अजय आणि रवीना दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याचा दावा तिने केला होता. इतकंच नव्हे तर अजयने तिला प्रेमपत्रंसुद्धा लिहिली असल्याचं रवीनाने स्पष्ट केलं होतं.

हे वाचा:   कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान विकी कौशलचं हैराण करणारं विधान, म्हणाला - 'मी परफेक्ट नवरा...'

रवीनाच्या या दाव्यामुळेच तिच्यात आणि अजय देवगणमध्ये खटके उडाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर रवीनाच्या या वागण्याकडे एक पब्लिसिटी स्टंट म्हणून अजय देवगणने दुर्लक्ष केलं होतं. “ती खूप नाटकी आहे, याबरोबरच ती जन्मजात खोटारडी आहे” असं म्हणत तेव्हा अजय देवगणने हात झटकले होते.

रवीना ही अजयची बहीण निलमची मैत्रीण होती आणि त्यामुळेच तिचं घरी येणं जाणं होतं. याबरोबरच तेव्हा त्यांच्यात असं काहीच नसल्याचा खुलासा अजय देवगणने केला होता. सध्या हे दोघेही त्यांच्या त्यांच्या आयुष्यात खुश आहेत. अजय देवगणने अभिनेत्री काजोलबरोबर लग्न केलं आणि रवीनानेसुद्धा उद्योगपती अनिल थडानीबरोबर संसार थाटला. नुकत्याच नेटफ्लिक्सच्या ‘अरण्यक’ या वेबसीरिजमधून रवीनाने ओटीटी विश्वात पदार्पण केलं.

 

Leave a Reply