कल्याण ची ट्रेन पकडताच एक पुरुष या मुलीचा पाठलाग करू लागला..मग बघा पुढे त्याने काय केले.. सर्व महिलांनी जाणून घ्या..

Uncategorized

नमस्कार मित्रांनो, आज-कालच्या मुली मित्र-मैत्रिणींच्या वाढदिवसानिमित्त किंवा इतर कोणत्याही पार्टीमध्ये अगदी आनंदाने जात असतात. अशीच एक मुलगी एका पार्टीमध्ये गेली होती. तिची पार्टी फारच उशिरा संपली. तशी ती पार्टीत रमणारी नव्हती. वडील शाळेत शिक्षक. शिकवण्याची आवड म्हणून आणि समाजसेवेची आवड म्हणून रात्र शाळेत हि शिकवायचे.

   

मैत्रिणींनी आग्रह केला म्हणून ती पार्टीला गेली होती. आता खूप उशिरा झाला होता, चला आता गाडी गाठायला हवी. VT स्टेशन वर ती आली. कल्याण गाडी मिळाली. रात्र फार झाली हाती म्हणून लेडीज डबा नको म्हणून जेन्टस डब्यातच शि’रली. माणसे पण कमी होती. तेवड्यात एक दा रु डा व्यक्ती डब्यात शिरला. अगदी अजागळ. तिच्या समोरच बसला.

तिच्या कडे एकटक पाहत होता. ती मनातून खूप घाबरली होती. गाडी पुढे जात होती. त्या डब्यामध्ये ठाण्या पर्यंत दोघे तिघेच उरले होते. तिला याची भीती वाटत होती की, आता राहिलेले हे पण सगळे डोंबिविलीला ला उतरले तर काय ? कल्याण पर्यन्त कसे जायचे. समोर तो बसलाच होता. ते उतरले तर आपण पण उतरू आणि डबा बदलू. पण ते उतरले नाहीत बहुदा कल्याण चेच असावेत.

हे वाचा:   अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई? स्टार कपल हॉस्पिटलबाहेर झालं स्पॉट

तिला थोडे बरे वाटले. कल्याण आले. एकदम लक्ष्यात आले आज रिक्षा संप आहे. चालत जाण्याशीवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. ती निघाली तो तिच्या मागेच होता. आता मात्र ती खूपच घाबरली. रस्त्याच्या कडेला काही माणसे झोपली होती. एरवी त्यांना ती घाबरली असती पण आज मात्र त्यांचाच तिला आधार वाटला. तो मात्र ठराविक अंतर ठेवून तिच्या मागे होता.

मेन रोड गेला तिचे घर गल्ली बो’ळात होते. तिथे मात्र अंधार जास्त. आता मात्र त्याने दोघांमधले अंतर कमी केले. घर दिसल्यावर ती धावतच निघाली बेल वर बेल दाबत राहिली. आतून वडिलांचा आवाज.. अग हो किती बेल वाजवतेस. दार उघडताच आत शिरली. अग किती उशीर केलास. ती ने उत्तर दिले नाही घटाघटा पाणी प्यायली.

तेव्हड्यात बेल वाजली तिच्या मनात द’स्स झाले.  वडिलांनी दार उघडले. तोच माणूस उभा होता. वडिलांनी विचारले, कोण पाहिजे.. त्याने वडिलांना वाकून नमस्कार केला. सर मी तुमचा रात्र शाळेचा विद्यार्थी. घरची आणि सभोवतालची परिस्तिथी मुळे दा’रू प्यायला लागलो. पण मूळ संस्कार तुमचेच आहेत. तुमच्या परिवाराला कोण ओळखत नाही.

हे वाचा:   `या` व्यक्तीला डेट करतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी? मिस्ट्रीबॉयसोबतचे फोटो समोर

पण माझी अशी अवस्था तुमच्या मुलीशी बोललो असतो तर तिचा विश्वास बसला नसता म्हणून हा उपद्व्याप करावा लागला. तिला सांगा इतक्या रात्री एकटी येऊ नकोस दिवस वाईट आहेत आणि प्रत्येक वेळेस तुमच्या हाताखालून गेलेला विद्यार्थी रखवालदार म्हणून तिला मिळेलच असे नाही. वडिलांनी त्याला आत बोलवून चहा पाणी दिला. आणि त्याचे आभार मानले.

मुलीच्या सुद्धा जीवात जीव आला. तो व्यक्ती ४० वर्षांचा होता. तो दा’रुडा जरी असला तरी बोलण्या वागण्यावरून तो एक सभ्य व्यक्ती होता. मित्रांनो या मुलीसोबत तर असा एक मोठा भाऊ असल्यासारखे याने तिचे रक्षण करत तिला घरापर्यंत पोहचवण्यास मदत केली. पण या जगात सध्या अशी माणसे फार कमी आणि वाईट प्रवृतीचे लोक जास्त आहेत.

त्यामुळे आपण आपले रक्षण करावे. आपण जास्तीत जास्त सेफ कसे राहू याचा विचार करूनच प्रवास करावा. कारण, सध्या मुंबई सारख्या मोठ्या गर्दीच्या शहरात सुद्धा अनेक गु-न्हे वाढले आहेत. पो-लीस तर आपल्या रक्षणासाठी आहेतच. पण आपण सुद्धा स्वताची जबाबदारी पार पाडावी आणि अशा एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना त्यांच्या रक्षणासाठी सहकार्य करावे.

Leave a Reply