“आम्ही एकत्र रुमवर…” दिशा पटानीच्या कथित बॉयफ्रेंडने त्यांच्या नात्याबद्दल केला खुलासा

Uncategorized

बॉलिवूड अभिनेत्री सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. चित्रपटापेक्षा त्या कोणाबरोबर डेटला जात असतात यावर चर्चा होत असते. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार. मात्र या दोघांच्या ब्रेकअपनंतर दिशा सध्या एका व्यक्तीबरोबर सातत्याने दिसून येत आहे. ती व्यक्ती आणि दिशा डेट करत आहेत अशा चर्चा रंगत असताना त्या व्यक्तीने यावर भाष्य केलं आहे.

   

दिशा पटानीने भलेही इंडस्ट्रीत काही चित्रपटांमध्ये काम केले असेल, परंतु तिच्या सर्वच चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयाने आणि तिच्या शैलीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. दिशा ज्या व्यक्तीबरोबर सातत्याने दिसत आहे ती व्यक्ती म्हणजे अलेक्झांडर अॅलेक्स, हा तिचा जिम ट्रेनर आणि मित्र आहे.

हे वाचा:   'रंग माझा वेगळा' मालिकेत जिनिलिया डिसुझाची एंट्री; साधी भोळी अभिनेत्री चाहत्यांना लावणार 'वेड'

अलेक्झांडर नुकत्याच एका मुलाखतीत असं म्हणाला की,” मी पाहतो की काही आठवड्यांपासून लोक वैयक्तिक जीवनाबद्दल काहीतरी किंवा दुसरे बोलत आहेत. मुद्दा असा आहे की आपल्याला त्यातील सत्य माहित आहे. मला समजत नाही की आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करून लोक काय मिळवतील? हे लोक आम्हाला शांततेत का राहू देत नाहीत?”

दिशाबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, “२०१५ साली पासून आम्ही एकत्र राहत होतो. त्यावेळी दिशाही एका एजन्सीशी संबंधित होती. मी, दिशा आणि आमचे इतर मॉडेल मित्र एकत्र रूम शेअर करायचो. मी आणि दिशा दोघेही फिटनेसबाबत खूप सक्रिय आहोत, त्यामुळेच आमची मैत्रीही घट्ट झाली आहे.

आम्ही एकत्र जिमला जाऊ लागलो. दुपारचे आणि रात्रीचे जेवण एकत्र करायचे. त्या घरात आम्ही खूप वेळ एकत्र घालवला आणि त्यामुळे आम्ही घट्ट मित्र झालो. दिशा माझ्यासाठी कुटुंबासारखी आहे.”

हे वाचा:   “ती दगडाच्या काळजाची बाई…” संजय दत्तच्या पहिल्या पत्नीच्या बहिणीने माधुरीवर केलेले गंभीर आरोप

दिशा पटानी अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहमबरोबर ‘एक व्हिलन २’मध्ये दिसली होती. आता ती ‘योद्धा’ आणि ‘किक २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर अलेक्झांडर मूळचा सैबेरियाचा आहे, गेली ७ वर्ष तो मुंबईत आहे.

Leave a Reply