सायकल घेण्यासाठी पैसे नव्हते! पाच वर्षांत मालमत्ता 40 पट वाढली, आता सेबीच्या रडारवर

Uncategorized

शेअर बाजारातील प्रसिद्ध ऑप्शन ट्रेडर पीआर सुंदर यांच्या अडचणी एकापाठोपाठ वाढतच आहेत. यावेळी पी.आर सुंदरची कंपनी Mansun Consultancy प्रायव्हेट लिमिटेड कंपनीदेखील सेबीच्या चौकशीच्या कचाट्यात अडकली आहे. बाजार नियामकाच्या वेबसाइटनुसार, पी.आर. सुंदर यांच्या कंपनीची नोंदणी अनधिकृत गुंतवणुकीच्या सल्लागार कंपनी म्हणून नोंद झाली आहे. जर कोणत्याही व्यक्ती नोंदणी न करता गुंतवणूक सल्लागार सेवा देऊ केली असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं सेबीने स्पष्ट केलं आहे.

   

नुकतेच सुंदर यांना एका आक्षेपार्ह ट्विटमुळे सोशल मीडियावर मोठ्या टीकेला आणि रोषाला सामोरे जावे लागले होते. ट्विटमध्ये त्यांनी एका व्यक्तीच्या चर्चेला उत्तर देताना अत्यंत वैयक्तिक टिप्पणी केली होती. यानंतर त्यांना ट्विटरवर प्रचंड विरोध होऊ लागला. सुंदर आणि इतर ट्विटर वापरकर्त्यांमध्ये मार्क-टू-मार्क (एमटीएम) नुकसान पोस्टवरुन जोरदार वादविवाद झाला होता, त्याचवेळी त्यांनी वादग्रस्त विधान केले होते.

हे वाचा:   मलायका लग्नाआधीच झाली गरोदर, घटस्फोटानंतर होणार अरबाज खानच्या मुलाची आई, अर्जुन कपूरला बसला धक्का

सुंदर यांची मालमत्ता पाच वर्षांत 40 पट वाढली

2017 च्या मध्यात सुरू झालेल्या सुंदरच्या ट्रेडिंग फर्मने फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंगमधून फार कमी वेळात प्रचंड नफा कमवून सर्वांना आश्चर्यचकित केले. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2018 पासून  मनसन कन्सल्टन्सीच्या नफ्यात सातत्याने वाढ झाली. कंपनीचा निव्वळ नफा 2018 मध्ये 88.24 लाख रुपयांवरून 2022 च्या व्यावसायिक वर्षात 23.43 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

F&O ट्रेडिंगद्वारे कमाई केली

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार सुंदर यांचा F&O नफा आर्थिक वर्ष 2018 मधील 68.31 लाख रुपयांवरून 2022 मध्ये 14.06 कोटी रुपयांपर्यंत जवळपास 21 पटीने वाढली. सुंदर यांच्यासाठी गेली दोन वर्षे खूप चांगली गेली. FY2020 मध्ये 1.37 कोटीच्या F&O ट्रेडिंग तोट्यातून सावरताना सुंदर यांनी पुढच्याच वर्षी  5.65 कोटीचा नफा कमावला आणि तेव्हापासून, Mansun Consultancy चा नफा जवळपास तिपटीने वाढून 14.65 कोटी झाला आहे. याशिवाय, मनसन कन्सल्टन्सीची नेटवर्थ देखील पाच वर्षांत 1 कोटी रुपयांवरून 35.58 कोटी रुपयांपर्यंत जवळपास 35 पटीने वाढली आहे.

हे वाचा:   Ram Kapoor : राम कपूरने 'या' ट्रिकने कमी केले वजन, रात्री झोपण्यापूर्वी हे काम करायचा

नवीन गुंतवणूकदार आणि व्यापार्‍यांसाठी प्रेरणा

अलीकडील YouTube व्हिडिओमध्ये पीआर सुंदर यांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये 50 कोटी रुपयांच्या नफ्याचे लक्ष्य ठेवल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांत त्याच्या यशोगाथेवर अनेकांनी विश्वास ठेवला आहे. विशेषत: गुंतवणूक आणि व्यापाराच्या जगात जे नवीन आहेत त्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

पीआर सुंदरबद्दलच्या अनेक गोष्टी सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून अशा नवीन गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचत आहेत, ज्यामुळे त्यांना शेअर बाजाराच्या माध्यमातून अल्पावधीत यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळते. उदाहरणार्थ, दहावीत शिकत असताना तो चप्पल घालायचा, त्याच्याकडे सायकलही नव्हती.

Leave a Reply