आलिया भट नंतर दीपिका पदुकोण पण देणार गुड न्यूज?

Uncategorized

गेल्या काही दिवसापासून बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच दीपिका पादुकोण ही गुडन्यूज कधी देणार याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दीपीकाने खुद्द प्रेग्नेंसीबाबत खुलासा केला आहे.

   

बॉलिवूडमधील कायम चर्चेत असलेलं कपल म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह. रणवीर आणि दीपिकाच्या ऑन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचे अनेक चाहते आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात.

Dipika

दीपिका आणि रणवीर दोघेही एकमेकांविषयी नेहमी विविध गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. तसेच दीपिका पादुकोण तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या प्रोफेशनललाईफमुळे चर्चेत असते. दीपिका पदुकोणने 2018 साली अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न केले होते.

त्याच वेळी, एका मुलाखतीत दीपिका पादुकोण कुटुंब नियोजनाबद्दल बोलताना दिसली आहे. त्यावेळी तिने 10 वर्षाचं संपूर्ण नियोजन शेअर केले. पुढील दहा वर्षात ती अशा ठिकाणी असेल जिथे तिच्या आजुबाजूला 3 मुले खेळत असतील, ज्या मुलांना ती शूटिंगलाही घेऊन जाणार असल्याचे या मुलाखतीत सांगितले.

हे वाचा:   “ती दगडाच्या काळजाची बाई…” संजय दत्तच्या पहिल्या पत्नीच्या बहिणीने माधुरीवर केलेले गंभीर आरोप

तसेच त्यांचे एक लहान आणि सुखी कुटुंब असले अशी माहिती तिने मुलाखतीदरम्यान दिली. तसेच एका मुलाखतीदरम्यान रणवीर सिंहला त्याच्या बाळाबद्दल विचारण्यात आले. जर भविष्यात तुला आणि दीपिकाला मुलगी झाली तर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव काय ठेवणार?’

असा प्रश्न रणवीरला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रणवीर म्हणाला, “मी बाळाच्या नावाची एक लांबलचक यादी तयार केली आहे.पण एवढ्यात मी ती नावं उघड करणार नाही.”

“मला लहान मुलं प्रचंड आवडतात. मला त्यांची नाव फार हटके असावीत असे वाटते. आम्ही गेल्या काही दिवसांपासून यावर बाळाच्या नावावर चर्चा करत आहोत. पण ही नाव थोडी गुपित ठेवण्यात आली आहेत.

कारण ती कोणीतरी दुसऱ्याने चोरुन ठेवावी, असे मला वाटत नाही”, असं यावेळी रणवीर सिंह म्हणाला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दीपिका ही प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

Leave a Reply