‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. मालिका आणि मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या अतिशय जवळच आहे. प्रत्येक पत्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, आजही मालिका प्रेक्षकांच्या मनात अव्वल स्थानी आहे. मालिकेतील जेठालाल आणि बबीताचं नाही तर अन्य कलाकार देखील चर्चेत असतात.
विशेष म्हणजे या मालिकेतील बबीता (babita TMKOC) सर्वाना फार आवडते, मुख्यतः तरुण वर्ग बबिताचा जास्तच चाहता आहे. बबिता म्हणजे अभिनेत्री मूनमून दत्ता. मूनमून दत्ता (munmundutta) सोशल मीडियावर (social media) कायम ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
सोशल मीडियावर तिचं कौतुक करणाऱ्यांची संख्या आणि ट्रोल करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. कलाकार म्हटलं की कौतुक आणि त्याचसोबत ट्रोल करणं हे आलंच. बबिताच्या बाबतीत अतिशय धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. काही दिवसांपूर्वी बबीताला एका व्यक्तीने असा काही प्रश्न विचारला होता कि, तो ऐकून तिचा संताप उडाला. आणि रागारागात तिने त्या व्यक्तीला असं काही सुनावलं की त्याच्या आयुष्यभर ते लक्षात राहील.
बाबीतला एका व्यक्तीने प्रश्न विचारला की, ”एका रात्रीसाठी किती घेशील ? या प्रश्नावर मुन्मुणी खूप भडकली आणि तिने प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला चांगलेच खडेबोल सुनावले
ती म्हणाली ”का इथे भीक मागायला आला आहेस, देवाने इतका कुरूप चेहरा दिला आहे त्याचप्रमाणे घाणेरडं तुझं बोलणं आहे, तुझासारख्या कोणावरही मानस थुंकणार पण नाहीत, तुला जे पण काही बोलायचं आहे समोर येऊन बोल, तुला तर ब्लॉक च करणार आहे पण त्याआधी म्हटलं तुला तुझी औलाद दाखवावी ” असं म्हणत, मुनमुनने त्या व्यक्तीला सुनावलं आणि गप्प केलं.