श्री महालक्ष्मी घरात येताना देते आपल्याला हे 5 संकेत.. चुकूनही दुर्लक्ष करू नका..

अध्यात्म

मित्रांनो घरात लक्ष्मी येण्याआधी आपल्याला देत असते हे 5 संकेत चुकूनही याकडे आपण दुर्लक्ष करायचं नाही. माता लक्ष्मी कोणाच्याही घरी निवास करण्याआधी आपल्याला हे संकेत जरूर देत असते. जर तुमच्या बरोबर पण अस काही घडत असेल तर समजून जा की लवकरात लवकर तुमचं नशीब बदलणार आहे.

   

कोणत्याही मनुष्याच्या जीवनात चांगला व वाईट कालावधी येतच असतो आणि चांगला व वाईट कालावधी एक दुसर्यापासून विपरीत असतो. सुखाच्या नंतर दुःख व दुःखाच्या नंतर सुख हे जरूर येतच असते ही जीवनाची दोन चक्रे आहेत. या संसारात प्रत्येक मनुष्य वाईट परस्थितीतून चांगल्या काळात जाण्याची देवाकडे कामना करीत असतो.

अश्या वेळी एक चांगली व्यक्ती तीच असते जो दोन्ही वेळेला देवांचे स्मरण करत असते. आपल्या जीवनात चांगला किंवा वाईट काळ येण्याआधी हे संकेत देत असतात. पण आपण माणसे आपल्या कार्यात इतकी व्यस्थ असतो की ते आपण समजू शकत नाही.

हिंदू ध र्म शास्त्रामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवता मानलं गेलं आहे. असे म्हणतात की माता लक्ष्मी खूप चंचळ स्वभावाची असते व ती कधीही एका जागेवर स्थिर राहत नाही. जर कुणी माणूस माता लक्ष्मीची पुजा भक्ती भावाने करतो कधी कोणाचे मन दुखावत नाही. त्यांच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते व त्यांना धन व सुख, समृद्धीचा आशीर्वाद देते. तर चला जाणून घेऊ या ते संकेत कोणते आहेत.
जर तुम्हाला स्वप्नात झाडू दिसला किंवा सकाळी म्हणजे 4 ते 5 वाजता च्या वेळी झाडू मारत असलेली भंगी किंवा झाडू वाला दिसला. तर समजून जा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे. कारण झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे.
माता लक्ष्मीचे वाहन घुबड आहे अश्या वेळी जर तुम्हाला तुमच्या जवळपास घुबड दिसले.

हे वाचा:   दुकान चालत नसेल तर करा हा उपाय...लोकांना आपल्या दुकानाकडे खेचण्याचा गुप्त उपाय..

तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे व लवकरात लवकर तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा दृष्टी होणार आहे. जिथे घुबड असते तिथे माता लक्ष्मी जरूर असते. जर तुमच्या बरोबर असे होत असेल तर माता लक्ष्मीचा जप करणे सुरू करा. व असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल व परत जाईल.

जर तुमच्या घरातील झाडे, रोपे सुखले असतील पण ती परत हिरवीगार होत असतील. जर तुमच्या जवळपास हिरवळ वाढली आहेत किंवा तुमचे मन हिरव्या रंगाकडे आकर्षित होत असेल. तर समजून जा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे.
जर अचानकपणे तुमच्या समोर ऊस दिसू लागला तर हा संकेत तुमचे दिवस पालटणार आहे. हा एक शुभ संकेत मानला जातो.

सकाळी उठल्यावर सर्व प्रथम जर शंकाचा नाद किंवा आवाज ऐकू आला तर लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत मानला जातो. तुमचे नशीब लवकरच उघडणार आहे. जर तुम्हाला स्वप्नात कुंभार घडा किंवा माठ तयार करताना जर दिसला. तर तुमच्या घरात माता लक्ष्मी निवास करणार आहे.

हे वाचा:   श्रावणात महिन्यात भगवान शंकराला अर्पण करा 1 वस्तू; मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण.!

देवाण घेवाण करताना जर पैसे तुमच्या हातून पडले. तर समजून जा तुम्हाला धन लाभ होणार आहे. कुठेही जाताना जर मुंगुसाने तुमच्यासमोर रस्ता ओलांडला किंवा तुम्हाला मुंगूस जरी दिसला. तर हा माता लक्ष्मी येण्याचा संकेत आहे. गुरुवारच्या दिवशी कुमारी मुलगी जर पिवळ्या वस्त्रात दिसली तर हे एक शुभ संकेत मानला जातो. हा धन लाभ होण्याचा संकेत आहे.

जी व्यक्ती स्वप्नात मोती हार मुकुट बघतो. त्याच्या घरात माता लक्ष्मी स्थिर होते व निवास करते. हिंदू ध’र्मात असे म्हणतात की जेव्हा देवी लक्ष्मीची कृपा होते तेव्हा सगळ्यात प्रथम लोकांच्या स्वभावात व व्यवहारात बदल व्हायला सुरुवात होते.

अहंकार कमी होतो व परिवारात प्रेम वाढत व पती- पत्नी मध्ये प्रेम वाढत. विष्णू भगवान यांची अर्धांगिनी माता लक्ष्मी जेव्हा घरात येणार असते तेव्हाच काही संकेत मिळणे सुरू होते. तुम्हाला जर असे काही संकेत मिळाले असतील तर तयार रहा माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply