घराच्या दक्षिण दिशेला या गोष्टी नसाव्यात; नाहीतर घर बरबाद होते…वास्तुशास्त्र माहिती..

अध्यात्म

नमस्कार, आज आपण वास्तुदोषाबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या घरातील दक्षिण दिशेला घडणारी अगदी छोटीशी चूक ही आपल्याला व आपल्या परिवाराला किती बरबाद करू शकते हे आपण पाहणार आहोत. तर या वास्तुदोषामुळे आपलं नुकसान किती होत असत तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिल असेल की एखादा बिल्डर बिल्डिंगच्या बिल्डिंगी उभ्या करतो परंतु त्याचा एकही फ्लॅट विकला जात नाही परिणामतः त्याला नुकसानीला सामोरे जावे लागते.

आणि याच कारण आहे वास्तुदोष तसेच एखादा व्यक्ती कंपनी टाकतो ती कंपनी देखील वर्षाच्या आत बंद पडते हा देखील एक वास्तुदोष आहे. बांधकाम करताना घर बांधताना किंवा एखादी कंपनी सुरू करताना अगोदर त्या वास्तुमधील वास्तुदोष काढणे खूप गरजेचे आहे. बरेच लोक हे वास्तुदोष मानत नाहीत. बरेच लोक म्हणतात की या वास्तुमध्ये याच घरामध्ये आम्ही लाखो रुपये कमावले आहेत तर या वास्तुमध्ये दोष कसा? परंतु त्याच व्यक्तींना काही कालांतराने ही वास्तु विकावी लागते.

याची अगदी जिवंत उदाहरणे आहेत. तर या अश्या प्रकारची अधोगती आपली होऊ नये असे जर आपल्याला वाटत असेल. तर आपल्या घरातील वास्तुदोष दूर करणे हे आपल्या हातात आहे. तुम्ही बऱ्याच घरात असे पाहिले असेल की एखादा मोठा बंगला असेल परंतु त्या बंगल्याची जलमट ही कधी निघतच नाही. तसेच त्या घरात सतत पालींचा प्रवेश राहतो.

हे वाचा:   अशा ४ लोकांना कधीच आपल्या घरात येऊ देऊ नका..आपल्या घराचा घात करतात अशी लोक..जाणून घ्या

सतत वटवागळाचा प्रवेश राहतो आणि कबुतर सारखे गुटर गु करत राहतात. याचा अर्थ त्या वास्तुमध्ये काहीतरी बाधा असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. कधी कधी आपण एखादा फ्लॅट विकत घेतो किंवा एखाद घर विकत घेतो. पण त्या घरात एखाद मांजर आणलं तर ते मरण पावते जास्त दिवस ते मांजर जगणार नाही.

किंवा एखादा कुत्रा आपण पाळला तर तो देखील जास्त दिवस राहणार नाही. तर या मागे कारण असते याचा आपण कधी विचार करत नाही. तर या सर्व गोष्टी मागचे कारण एकच ते म्हणजे वास्तुदोष हा वास्तुदोष हळूहळू आपल्या प्रगतीच्या आड येत असतो परंतु ही गोष्ट आपल्याला अगदी उशिरा लक्षात येते आणि तोपर्यंत आपल्या बरबादिला सुरवात झालेली असते. तर असच एक वास्तुदोष आज आपण पहाणार आहोत.

आपल्या घरातील दक्षिण दिशेला घडणारा हा वास्तुदोष आपल्या घराची दक्षिण दिशा ही अग्नीसाठी ओळखली जाते अग्नी म्हणजे शक्तीचे प्रतिक आहे. अग्नीमुळे आपल्याला शक्ती निर्माण होते. आपल्या घरात ऊर्जा निर्माण करण्याचे काम दक्षिण दिशा करत असते. आपल्या शरीरात जसे 5 तत्व असतात तसेच आपल्या घरात देखील 5 तत्व असतात.

शरीरात अग्नी तत्व असतात तसेच आपल्या घरामध्ये देखील अग्नी तत्व वावरत. आपल्या शरीरात असणारा अग्नी आपले शरीर सुरळीत चालण्यासाठी काम करते परंतु तोच अग्नी आपण मंद केला व विजवला तर आपलं शरीर हे कोलमडून पडत आणि अगदी हीच क्रिया आपल्या घराच्या बाबतीत घडते.

हे वाचा:   घरावरील करणी बाधेचे प्रकार नक्की वाचा...या पासून वाचण्याचे उपाय जाणून घ्या

आपल्या दक्षिण दिशेला जर अग्नी वावरत असेल आणि आपण त्याठिकाणी जर पाण्याचा वापर केला तर हा पूर्णतः विरुद्ध दिशा बनते आणि परिणामी आपले दक्षिण दिशा जे आपल्याला अग्नी देण्याचे काम करते ती मंदावल्याने आपल्या घराची प्रगती ठप्प होते. आपल्या दक्षिण दिशेला नदी असेल तलाव असेल किंवा नालीच्या स्वरूपात पाणी वाहत असेल किंवा आपल्या पाण्याची टाकी दक्षिण दिशेला असेल तर त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या प्रगतीवर घडून येतो.

कारण अग्नी व पाणी हे एका ठिकाणी राहत नाही. म्हणूनच दक्षिण दिशा आणि पाणी याना नेहमी लांब ठेवा. जर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला मोकळी जागा असेल जर तुम्ही झाडे लावला असाल किंवा एखादे परस बाग बनवला असाल. तर हे सुद्धा बरबादीचे कारण आहे. अशी मोकळी जागा ठेवणे हे वास्तुशास्त्रानुसार चुकीचे आहे. जर कोणाच्या वास्तुमध्ये असा दोष असेल तर त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी बदल करण्याची आवश्यक आहे.

Leave a Reply