नमस्कार वाचक मित्रानो,
तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे. आपल्या देशातमध्ये प्रत्येक धर्मात वास्तूशास्त्राचे खूप महत्व आहे.स्वयंपाक घराच्या भिंत्तीवर ही एक वस्तू लावा आपल्या घरामध्ये नेहमी अन्न धान्याची वृद्धी होईल.आपण आपल्या घरासाठी पैशासाठी श्रीमंतीसाठी, धनसंपदा, सुख समृद्धी साठी लक्ष्मी मातेची आराधना करतो.
आपण मनोभावे नेहमी लक्ष्मीची उपासना आणि प्रार्थना करतो.आपल्या घरामध्ये नेहमी आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरात ठेवतो.देवीची पूजा करून आराधना करतो. अन्नपूर्णाचे विशेष छान हे आपल्या घरातील स्वयंपाक घर म्हणजे तिचे असते. आपण आपल्या किचनला देव घरासारखे साफ ठेवले पाहिजे.
स्वयंपाक घर हे खूप पवित्र ठिकाण आहे.यामुळे कचरा आणि भंगार किंवा जुन्यापुराण्या वस्तू स्वयंपाक घरात ठेवू नयेत.आपण आपल्या किचनमध्ये भिंतीवर एक वस्तू लावायला पाहिजे. ही वस्तू म्हणजे अन्नपूर्णा मातेचा फोटो. तुम्हाला अगदी हवा तसा म्हणजे छोटा किंवा मोठा असा फोटो घ्या. अन्नपूर्णा मातेचा फोटो हा पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावा.फक्त दक्षिण दिशेच्या भिंतीवर अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू नयेत.
सकाळी उठल्यावर किचनमध्ये आल्यावर मातेला नमस्कार करून प्रार्थना करा.यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकआणि उत्तम गोष्टी घडू लागतील. तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची कृपा राहील.घरामध्ये आलेल्या व्यक्तीला अन्नदान करणे खूप महत्वाचे आहे. अन्नदान हे सर्वात मोठे दान आहे. अन्नपूर्णा मातेची आपल्यावर सतत कृपा राहण्यासाठी आपण अन्नाचा खूप आदर केला पाहिजे.
जेवून उरलेले अन्न वाया न घालवता मुक्या प्राण्यांना आणि गरजू लोकांना दिले पाहिजे. असे केल्यास आपल्याला उत्तम पुण्य लाभते.जेवताना नेहमी मनापासून अन्नपूर्णा देवीचे आभार मानले पाहिजे.असे केल्यामुळे आपल्या घरात सुख शांतीची वृद्धी होते.घरामध्ये स्वयंपाक बनवणाऱ्या स्त्रियांचे देखील आभार मानले पाहिजे.
जेवण करताना अन्नाबद्दल कधीही वाईट बोलू नये.अन्नावर कधीही राग राग करू नये.असे केल्याने आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्रय येते. यामुळे जीवनात जगताना वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवा.वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा,धन्यवाद.