मुंबई 4 डिसेंबर : आलिया भट्टने नुकतंच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. एप्रिलमध्ये तिने रणबीर कपूरशी लग्न केले. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2022 ली ती आई देखील झाली झाली. आलियाबद्दल असे म्हटले जात आहे की, ती लग्नापूर्वीच प्रेग्नेनंट होती. त्यामुळेच लग्नाला ९ महिने देखील झाले नाही, त्या आधीच आलियाने आपल्या मुलीला जन्म दिला आहे. ज्यामुळे आलियाबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे, तसेच यासाठी आलिया ट्रोल देखील झाली आहे.
आलिया भट्टच नाही तर अशा काही सेलिब्रिटी आहेत. ज्या लग्नापूर्वीच आई झाल्या आहेत. या यादीमधील काही नावं तुम्हाला माहित देखील असतील, पण काही नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल हे नक्की
श्रीदेवी मीडिया रिपोर्टनुसार, श्रीदेवीचं लग्न झालं तेव्हा त्या 7 महिन्यांच्या प्रेग्नेंट होत्या. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
नताशा स्तांकोविक हार्दिक पांड्याची बायको आणि अभिनेत्री नताशा देखील लग्ना आधी आई झाली आहे. एवढंच काय तर या दोघांनी मुल झाल्यानंतर लग्न केलं आहे असं म्हटलं जातं.
सेलिना जेटली सेलिना जेटलीने जुलै २०११ मध्ये लग्न केले आणि मार्च २०१२ मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेलिना लग्नापूर्वी प्रेग्नेंटही होती.
सारिका मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता कमल हसनसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना सारिका प्रेग्नेंट राहिली होती. नंतर त्यांनी लग्न केलं, ज्यानंतर सारिका यांनी एका मुलीला जन्म दिला. जी एक अभिनेत्री देखील आहे.
कोंकणा सेन शर्मा या यादीत कोंकणा सेन शर्माचं नाव पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या काही महिन्यांनंतरच अभिनेत्रीने तिच्या बाळाला जन्म दिला. ज्यामुळे ती देखील लग्नापूर्वीच प्रेग्नेन्ट राहिली असावी असं मीडिया रिपोर्टनुसार समोर आलं आहे. अभिनेत्रीने 2010 साली लग्न केले होते.
नेहा धुपिया बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया खूप चर्चेत असते. रिपोर्ट्सनुसार, नेहा धुपिया लग्नाआधीच प्रेग्नेंट होती. त्यानंतर तिने घाई करत लग्न केलं, या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
अमृता अरोरा मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृता लग्नापूर्वी प्रेग्नेंट होती. लग्नानंतर काही महिन्यांनी अमृता अरोराने एका मुलाला जन्म दिला