आईला फोन केला म्हणून… बापाचं पोटच्या मुलीसोबत निर्दयी कृत्य, बीड हादरलं

Uncategorized

बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप -लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. दारुड्या पित्याने आपल्याच दहा वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

   

आजी -आजोबांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी चिमुकलीच्या आजीने बीड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपीने आपल्याच मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला आहे. आरोपी दारूच्या आहारी गेला होता. दारूच्या नशेत तो घरच्यांना त्रास देत होता. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी 6 महिन्यांपूर्वी माहेरी राहण्यासाठी गेली आहे. आरोपीला दोन मुली आहेत, एकीचं वय दहा वर्ष असून, दुसरी सहा वर्षांची आहे. त्या दोन्ही मुलींचा सांभाळ त्यांचे आजी, आजोबा करतात.

हे वाचा:   'पती लाजाळू असल्याने करु शकत नाही 'हे' काम'; ऐश्वर्या राय बच्चनचं मोठं वक्तव्य

आरोपीला अटक 

7 डिसेंबरला “तू तुझ्या आईला फोन का केलास”, असे म्हणत 10 वर्षीय पीडित मुलीला आरोपीने मारहाण केली. त्यानंतर 8 डिसेंबरच्या पहाटे त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी आजी, आजोबांनी नातीची आरोपी बापाच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर ते रिक्षाने पीडित मुलीला आपल्या नातेवाईकांच्या घरी घेऊन गेले.

दरम्यान या प्रकरणी आजीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

Leave a Reply